Header AD

बाळकूम, राबोडीत ठामपाच्या नळ जोडणी तून भरले जाते पाणी बिस्लेरीचे लेबल लावून पाणी विक्री


ठाण्यात बेकायदा पॅकेज वाॅटरचा गोरखधंदा पाच ठिकाणी सुरू आहे प्लांट.....


ठाणे (प्रतिनिधी) -  अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी नसतानाही ठामपाच्या नळजोडणीतून पाणी  घेऊन ते पॅकेज वाॅटर म्हणून विकण्याचा गोरखधंदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे विधान सभाध्यक्ष अभिषेक पुसाळकर यांनी उघडकीस आणला आहे. 


अभिषेक पुसाळकर यांचा बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्यासह एफडीआयने प्रमाणित केलेले सात प्लांट कार्यरत आहेत. या सात कंपन्याना पॅकेज वाॅटर विकण्याचा परवाना आहे. मात्र, ठामपाकडून खुले  पाणी विकण्याची परवानगी असतानाही बाळकूम, राबोडी, ज्ञानेश्वर नगर आणि सावरकर नगर  या भागात अनुक्रमे , विहाना इंटरप्रायजेस,  साई सागर, क्षिप्रा चिल्डवाॅटर, सागर चिल्ड वाॅटर, संतोष चिल्ड वाॅटर या कंपन्या बेकायदेशीरपणे ठामपाच्या नळाचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता जारमध्ये भरून विकत आहेत.  विशेष म्हणजे ठामपाच्या अर्धा इंच पाईपलाईनमधून हे पाणी भरण्यात येत आहे. 


सोमवारी दुपारी खोपट येथे अभिषेक पुसाळकर हे उभे असताना विकी पाटील यांच्या विहाना इंटरप्रायजेसच्या एका वाहनातून जारला बिस्लेरीचे  लेबल लावून पाण्याची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी  त्यांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस  आला. या संदर्भात त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र कागदपत्रे तपासून गुन्हे दाखल करण्यात येतील,असे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

बाळकूम, राबोडीत ठामपाच्या नळ जोडणी तून भरले जाते पाणी बिस्लेरीचे लेबल लावून पाणी विक्री बाळकूम, राबोडीत ठामपाच्या नळ जोडणी तून भरले जाते पाणी बिस्लेरीचे लेबल लावून पाणी विक्री Reviewed by News1 Marathi on April 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads