Header AD

माझे मानधन , सर्व भत्ते कोव्हिड रुग्णासाठी खर्च करा

  

■ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन ...



भिवंडी दि.  २७ (प्रतिनिधी  ) कोविड काळात रुग्णांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. दानशूर मंडळी सढळ हस्ते मदत, सहकार्य करत आहेत. असे असतानाच ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती यांनी या परिस्थितीचे भान राखत त्यांना मिळणारे मानधन, सर्व भत्ते कोविड रुग्णासाठी खर्च करावेत असे लेखी निवेदन त्यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले आहे. 


               भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्णा गटाचे कुंदन पाटील हे प्रतिनिधित्व करत असून सध्या ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समिती सभापती पदावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला असून कोविड काळात देखिल प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली आहे . 
       
     
                 ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असून मुलींच्या जन्माचे स्वागत कुटूंबात व्हावे यासाठी त्यांच्या दापोडे ग्रामपंचायत क्षेत्रात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी त्यांनी वडिलांच्या नावे तुळशीरत्न कन्या ही योजना सुरू केली असून आपल्याकडून कोरोना काळात छोटीशी मदत व्हावी यासाठी आपले मानधन व मिळणार भत्ते गरजू रुग्णांना मदत व्हावी याकरीता दिले असून त्यामुळे मला निश्चितच समाधान मिळेल यापुढे देखील अशाच प्रकारे शक्य होईल तेवढी मदत मी कोरोना रुग्णांसाठी करणार आहे अशी प्रतिक्रिया सभापती कुंदन पाटील यांनी दिली आहे.
माझे मानधन , सर्व भत्ते कोव्हिड रुग्णासाठी खर्च करा माझे मानधन , सर्व भत्ते कोव्हिड रुग्णासाठी खर्च करा Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads