Header AD

फुटबॉल प्रशिक्षक शब्बीर शेख यांचे निधन




कल्याण , कुणाल  म्हात्रे  फुटबॉल प्रशिक्षक म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये ओळख असणारे आणि ऑल सेंड शाळेचे क्रीडाशिक्षक म्हणून काम करणारे शब्बीर शेख यांचे गुरुवारी दुःखद निधन झालं आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.


 क्रीडा क्षेत्राला सर्वांनाच परिचित असणारे आणि फुटबॉलची जिल्ह्यामध्ये कोणतीही स्पर्धा असल्यानंतर प्रत्येक ठिकाणी उपस्थित  राहून खेळाडूचा उत्साह वाढवणारे म्हणून त्यांची ख्याती होती.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शासनाच्या जिल्हा आणि राज्य स्पर्धा ऑल सेंड शाळेमध्ये आयोजन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली असूनक्रीडा क्षेत्रातील एका दिग्गज प्रशिक्षकाला मुकलो असल्याचे राज्य क्रीडा धोरण समिती सदस्य अविनाश ओंबासे यांनी सांगितले. तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

फुटबॉल प्रशिक्षक शब्बीर शेख यांचे निधन फुटबॉल प्रशिक्षक शब्बीर शेख यांचे निधन Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads