Header AD

शहरातील उपलब्ध हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्ण वाहिकेच्या माहिती साठी वॉर रूम मधील हेल्प लाईन क्रमांक २४ तास उपलब्ध नागरिकांनी संपर्क साधण्याचे महापालिकेचे आवाहनठाणे, प्रतिनिधी  : ठाणे शहरात उपलब्ध असणारी कोविड हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्णवाहिकेच्या अधिक माहितीसाठी महापालिकेच्या वॉर रूममधील हेल्पलाईन संपर्क क्रमांक २४ तास उपलब्ध करण्यात आले असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे  महापालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.      


     कोरोना संदर्भात नागरिकांनी गैरसोय होवू नये, उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्यावतीने अद्ययावत वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे.  यामध्ये १० संपर्क क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


      नागरिकांनी +९१ ८६५७९ ०६७९१,  +९१ ८६५७९ ०६७९२,  +९१ ८६५७९ ०६७९३, +९१ ८६५७९ ०६७९४,  +९१  ८६५७९ ०६७९५,  +९१  ८६५७९ ०६७९६,   +९१  ८६५७९ ०६७९७, +९१ ८६५७९ ०६७९८,  +९१ ८६५७९ ०६८०१  आणि  +९१ ८६५७९ ०६८०२  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


शहरातील उपलब्ध हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्ण वाहिकेच्या माहिती साठी वॉर रूम मधील हेल्प लाईन क्रमांक २४ तास उपलब्ध नागरिकांनी संपर्क साधण्याचे महापालिकेचे आवाहन शहरातील उपलब्ध हॉस्पिटल्स, बेड व्यवस्थेसह रुग्ण वाहिकेच्या माहिती साठी वॉर रूम मधील हेल्प लाईन क्रमांक २४ तास उपलब्ध नागरिकांनी संपर्क साधण्याचे महापालिकेचे आवाहन Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads