Header AD

दि सोल्‍ड स्‍टोअर कडून पुनर्चक्रण केलेल्‍या प्‍लास्टिक बॉटल्‍स पासून बनवलेल्‍या चेन्‍नई सुपर किंग्‍ज रेप्लीका जर्सींचे अनावरण
भारत, २३ एप्रिल २०२१: वर्षातील तो क्षण आला आहे, जेथे भारताचे दोन सर्वात लोकप्रिय पॅशन्स – क्रिकेट व मनोरंजन एकत्र आले आहेत. या काळादरम्‍यान क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात बहुप्रतिक्षित क्षण म्‍हणजे नवीन सीझनसाठी त्‍यांच्‍या आवडत्‍या संघाच्‍या जर्सीची डिझाइन.


सर्वात मोठ्या सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमाचा भाग म्‍हणून चेन्‍नई सुपर किंग्‍ज आणि दि सोल्‍ड स्‍टोअरने यंदा उल्‍लेखनीय संकल्‍पना ठरवली आहे. नवीनच डिझाइन केलेली चेन्‍नई सुपर किंग्‍ज रेप्‍लीका जर्सी जवळपास १५ प्‍लास्टिक बॉटल्‍सचा वापर करून बनवण्‍यात आली आहे (अन्‍यथा या प्‍लास्टिक बॉटल्‍समुळे समुद्री प्रदूषण झाले असते) आणि यामध्‍ये नेहमीच्या जर्सींच्‍या तुलनेत ९० टक्‍के कमी पाण्‍याचा वापर करण्‍यात आला आहे. जर्सी पुनर्चक्रण केलेल्‍या साहित्‍यापासून बनवलेल्‍या सानुकूल बॉक्‍समध्‍ये येते, ज्‍याला दिग्‍गज क्रिकेटर एमएस धोनी यांच्‍याकडून अस्‍सलतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.


सादर करण्‍यात आलेल्‍या नवीन जर्सीबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसण्‍यात आली आणि चाहते थालाला जर्सीचे अनावरण करताना पाहण्‍यासाठी उत्‍सुक होते. अनावरणाबाबत अधिक माहिती https://www.instagram.com/p/CMzfGQzgxfs/?igshid=wced0r55k4n7 येथे पहा.


''एक ब्रॅण्‍ड म्‍हणून आम्‍ही नेहमीच आमच्‍या व्‍यापक सामाजिक जबाबदा-यांशी आणि सातत्‍याने उत्तम व अधिक स्थिर पद्धतींचा अवलंब करण्‍याप्रती कटिबद्ध राहण्‍याशी बांधिल राहिलो आहोत. आम्‍ही ही गोष्‍ट सत्‍यात अवतरण्‍यासाठी साह्य केलेल्‍या आणि आमच्‍यासारखीच उत्‍कट व आवड असलेल्‍या संपूर्ण चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाचे आभार मानतो,'' असे दि सोल्‍ड स्‍टोअरचे सह-संस्‍थापक व संचालक हर्ष लाल म्‍हणाले.


सुपर किंग्‍ज हा आयपीएल इतिहासामध्‍ये सातत्‍याने उत्तम कामगिरी करणरा संघ आहे. या संघाने आयपीएलच्‍या ११ हंगामांपैकी १० हंगामांमधील प्‍लेऑफ्समध्‍ये प्रवेश मिळवला आहे आणि आठ वेळा अंतिम सामन्‍यामध्‍ये पोहोचण्‍यासोबत तीन वेळा विजेता ठरला आहे.


''आयपीएलच्‍या १४ हंगामांमध्‍ये आम्‍ही पहिल्‍यांदाच आमची जर्सी रिडिझाइन केली आहे आणि पुनर्चक्रण केलेल्‍या प्‍लास्टिकपासून बनवण्‍यात आलेली रेप्‍लीका जर्सी असण्‍याचा आनंद होत आहे. प्‍लास्टिक कचरा कमी करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी आणि हरित वसुधंरेप्रती कार्य करण्‍यासाठी योगदान देणे ही आपल्‍या सर्वांची जबाबदारी आहे,'' असे चेन्‍नई सुपर किंग्‍जचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी केएस विश्‍वनाथन म्‍हणाले.


दि सोल्‍ड स्‍टोअर मुंबई इंडियन्‍स, कोलकाता नाइट राइडर्स आणि राजस्‍थान रॉयल्‍स या संघांसाठी देखील ऑफिशियल मर्चंडाइझ पार्टनर आहे.


ऑफिशियल सीएसके २०२१ रेप्‍लीका जर्सी खरेदीसाठी दि सोल्‍ड स्‍टोअरची ऑफिशियल वेबसाइट व अॅपवर उपलब्‍ध आहे.    

 

दि सोल्‍ड स्‍टोअर कडून पुनर्चक्रण केलेल्‍या प्‍लास्टिक बॉटल्‍स पासून बनवलेल्‍या चेन्‍नई सुपर किंग्‍ज रेप्लीका जर्सींचे अनावरण दि सोल्‍ड स्‍टोअर कडून पुनर्चक्रण केलेल्‍या प्‍लास्टिक बॉटल्‍स पासून बनवलेल्‍या चेन्‍नई सुपर किंग्‍ज रेप्लीका जर्सींचे अनावरण Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads