Header AD

आमदार विश्वनाथ भोईर यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस केडीएमसी क्षेत्रातील लसीकरणाचा आढावा घेत डॉक्टर्स,परिचारिका, आरोग्य सेवकांचे केले कौतुक


■कुठल्याही प्रकारचे भय न बाळगता पात्र व्यक्तींनी  लस घेण्याचे केले आवाहन....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या  रूक्मिणीबाई रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्यांनी पात्र व्यक्तींनी लसीबाबत  कोणत्याही प्रकारचा गैरसमज अथवा भीती न बाळगता लस घेण्याचे आवाहन केले.


       आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असणाऱ्या लसीकरणाचा आढावा देखील यावेळी  घेतला. महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या वतीने आतापर्यंत एकूण ८० हजार जणांचे लसीकरण करण्यात आले असून एकूण ६८  हजार जणांना प्रथम डोस तर १२ हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. डॉ.संदीप निंबाळकर आणि त्यांची संपूर्ण टीम लसीकरणासाठी विशेष मेहनत घेत आहे त्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.


दरम्यान सध्या महापालिकेकडे फक्त ८००० डोस शिल्लक असून लस उपलब्ध होण्यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्कात असून लवकरात लवकर लस उपलब्धता होईल अशी ग्वाही आमदार भोईर यांनी दिली. त्याचप्रमाणे लसीचा तुटवडा भासणार नाही यासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे स्वतः जातीने लक्ष घालीत आहेत. जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी  सरकारतर्फे हरेक प्रकारचे प्रयत्न सुरू असून कोव्हिडं विरोधातील ही लढाई सर्वांच्या सहकार्याने आपण जिंकूच अशी खात्रीही आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार विश्वनाथ भोईर यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस केडीएमसी क्षेत्रातील लसीकरणाचा आढावा घेत डॉक्टर्स,परिचारिका, आरोग्य सेवकांचे केले कौतुक आमदार विश्वनाथ भोईर यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस केडीएमसी क्षेत्रातील लसीकरणाचा आढावा घेत डॉक्टर्स,परिचारिका, आरोग्य सेवकांचे केले कौतुक Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads