Header AD

कौसा येथील कोविड रूग्णालय बुधवार पासून सुरू होणार

 

■विरोधीपक्ष नेत्यांच्या भेटीनंतर अति. आयुक्तांचे आदेश..


ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या निधीतून सुरू केलेले आणि साहित्याची पळवा पळवी झाल्याने बंद पडलेले कौसा येथील कोविड रूग्णालय बुधवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या संदर्भात आदेश दिले. 


              मुंब्रा, कौसा आणि दिवा येथील नागरिकांसाठी ना. डाॅ.  जितेंद्र आव्हाड यांनी कौसा येथे कोविड रूग्णालय सुरू केले होते. मात्र, मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हे रूग्णालय बंद ठेवण्यात आले होते. याचाच फायदा घेऊन निलंबित आरोग्य अधिकारी मुरूडकर यांनी या रुग्णालयातील साधने लंपास केली होती. 


        त्यामुळे रूग्ण संख्या वाढूनही हे रूग्णालय सुरू केले नव्हते. आज या संदर्भात विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख  यांची भेट घेऊन सदर रूग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर गणेश देशमुख यांनी बुधवारपासून (दि. १४) हे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले.या संदर्भात त्यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले आहेत.

कौसा येथील कोविड रूग्णालय बुधवार पासून सुरू होणार कौसा येथील कोविड रूग्णालय बुधवार पासून सुरू होणार Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads