Header AD

ठाणे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी निधी देऊन कोविड रुग्णालय उभारा


■राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांची मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांसाठी सध्या बेडऑक्सिजनऔषधांसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. नेत्यांकडून केवळ प्रशासनाला सूचना दिल्या जातात. एवढ्यावरच न थांबता आता ठाणे जिल्हातील खासदारांनी प्रत्त्येकी दोनतर आमदारांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी कोरोना संकटकाळातील उपाययोजनांसाठी द्यावा. या निधीतून प्रत्येक जिल्ह्यात जम्बो कोविड रुग्णालय उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांनी केली आहे.


याबाबत त्यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील ३ खासदार व इतर सर्व आमदारांना निवेदन दिले आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रत्यक्ष भेट घेत या विषयावर चर्चा केली. हा विषय लावून धरत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. त्याच प्रमाणे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिका क्षेत्रात विशेष उपाययोजना करण्याची विनंती देखील केली.


भारत देशामध्ये कोविड १९ चा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. महाराष्ट्र राज्यात तर कोरोना विषानूने हाहाकार माजविला आहे. २०२० पासून कोरोना विषाणूने जिल्ह्यातील अनेक सामान्य गरीब जनतेचे कमरडे मोडलेले असूनहातात पैसे नसल्याने अनेक मध्यमवर्गीय गरीब जनता सरकारी रुग्णालयाची वाट धरीत आहेत. कोरोना विषानुग्रस्त लोकांना रुग्णालयात बेड,ऑक्सीजनकोविड प्लाझ्मा व रेमडेसिवर उपलब्ध न झाल्यानेअनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागलेले आहे.


     ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा खासदार,  १८ विधानसभा आमदार१ शिक्षक आमदार१ पदवीधर आमदार व १ जिल्हा परिषद अध्यक्ष असूनखासदार निधीतून २ कोटी व आमदार निधीतून १ कोटी अशाप्रकारे निधी देण्यात येऊनत्या निधीमधून ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासाठी एक हजार बेड व ग्रामीण भागासाठी एक हजार बेडचे भव्यदिव्य रुग्णालय उभारल्यास अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होणार आहे.


 जिल्ह्यातील अनेक दानशूर व्यापारी व उद्यागपती यांची देखील या कामात हातभार लावण्यासाठी मदत घेण्यात यावी. जेणेकरून कोरोना विषानूच्या प्रार्दुभावामुळे कोणाचाही नाहक बळी जाणार नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी निधी देऊन कोविड रुग्णालय उभारा ठाणे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी निधी देऊन कोविड रुग्णालय उभारा Reviewed by News1 Marathi on April 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads