Header AD

तुळजा भवानी बचत गटाची कामा संघटनेच्या अन्नदानास साथ
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  राज्यसरकारने `ब्रेक द चेनअंतर्गत लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गरजूंच्या मदतीला कामा (कल्याण अंबरनाथ  मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन)  संघटना धावून आली आहे. या संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून अन्नवाटप केले जात आहेत.  कामा संघटनेच्या  अन्नदान उपक्रमास  तुळजाभवानी बचत गटाने साथ दिली आहे.


  कामा एमआयडीसी संघटनेच्या वतीने गरजूंना अन्नवाटप केले जात आहे. त्यात भाजपाच्या ग्रामीण अध्यक्षा मनिषा राणे यांनी देखील त्यांना साथ दिली आहे.  विशेष म्हणजे मास्कचा वापर न करणाऱ्यांना अन्नदान वाटप केले जात नाही.  कामातर्फे ज्योतीनगर,कोपर रोडसंजय नगर मानपाडा रोडसावरकर रोड,आंबेडकर नगरकल्याण पत्रीपूल गरीब वस्तीतआदी ठिकाणी अन्नवाटप करण्यात येत आहे.


      तसेच संघटनेच्या वतीने येत्या काळात कामगारांचे लसीकरण देखील केले जाणार आहे. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष व भाजपाचे उद्योजक आघाडीचे द्रेवेंन सोनी,  उपाध्यक्ष नारायण टेकाडेसेक्रेटरी राजू बेल्लूर,माजी सदस्य जयवंत सावंतआशिष भानुशालीराहुल कासलीवालउदय वालावलकरसुरेश जैन  आणि कामाचे  सदस्य उपस्थित होते.


कामा या संघटनेने चांगला उपक्रम सुरू केला आहे. कामा संघटना ठिकाठिकाणी जाऊन अन्नवाटप करीत आहे. या लॉकडाऊनमध्ये कोणीही अन्नवाटप करताना फारसे दिसत नाही. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे त्यांना कामाच्या या उपक्रमाचा आधार वाटत आहे. कामाने तुळजाभवानी बचतगटातील काही लोकांना काम मिळवून दिले आहे. त्यामुळे बचतगटाच्या माध्यमातून लोकांना काम मिळत आहे. कामाने पहिल्या लॉकडाऊनमध्ये देखील अनेक प्रकारे मदत केली असल्याची माहिती तुळजाभवानी बचत गटाच्या अध्यक्षा मनिषा राणे यांनी दिली.

तुळजा भवानी बचत गटाची कामा संघटनेच्या अन्नदानास साथ तुळजा भवानी बचत गटाची कामा संघटनेच्या अन्नदानास साथ Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads