Header AD

कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी देणाऱ्या हेड मुकादमावर जीवघेणा हल्ला..

 
भिवंडी दि 6(प्रतिनिधी ) सध्या कोरोनाची दुसरी लाट येत असल्यामुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आपल्या कामात कामचुकारपणा करू नका असे कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी देणाऱ्या हेड मुकादम भारत तांबे यांचेवर जीवघेणा हल्ला केल्यामुळे शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 


भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये दोन विभाग असून एक शहर सफाई तर दुसरा मैला सफाई विभाग, या मैला सफाई विभागात हेड मुकादम म्हणून भारत तांबे हे काम करत आहेत, मैला सफाई विभागातील कामगार हे आपल्या मन मर्जीप्रमाणे वागत आहेत, त्यांना आरोग्य निरीक्षक किंवा मुकादमाने कामाची विभागणी करून काम सांगितले की ते आपल्या युनियन लीडर राजू सोंडा चव्हाण याला बोलावून त्या आरोग्य निरीक्षक किंवा मुकादमाला दम देण्याचे काम करीत आहेत, 


अशाच प्रकारे   उशिरा आलेल्या कामचुकार कामगारांना उशिरा का आले आणि सोपवलेले काम का केले नाही याची विचारणा भारत तांबे यांनी केली असता त्यांनी राजू चव्हाण ला बोलवले व राजू चव्हाण यांनी दारू पिऊन येऊन इतर कामगारांना भडकावले असता त्या 7 कामगारांनी भारत तांबे यांना केबिन बंद करून जीवघेणी मारहाण केल्यामुळे भारत तांबे यांच्या डोक्याला 6 टाके पडले असून उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे, या हल्ला प्रकरणी  शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून अजून कोणत्याही आरोपीस अटक केलेली नाही, 


भारत तांबे यांनी दिलेल्या जबाबाप्रमाणे 7 आरोपींची नावे असतानासुद्धा 3 लोकांवरच गुन्हा दाखल केला असून उर्वरित लोकांवर पूर्व नियोजित कट कारस्थान रचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून भादवी 120ब, 326 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदनही पोलीस उपायुक्त भिवंडी, यांना दिले आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे भारत तांबे यांचे लक्ष लागले आहे.
कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी देणाऱ्या हेड मुकादमावर जीवघेणा हल्ला.. कामचुकार कर्मचाऱ्यांना तंबी देणाऱ्या हेड मुकादमावर जीवघेणा हल्ला.. Reviewed by News1 Marathi on April 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads