Header AD

विक्रमी करवसुली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आयुक्तांनी केला सन्मानकल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची विक्रमी वसूली करणाऱ्या करसंकलन विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गांचा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  


गेले वर्षभर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचारी अथकपणे  आणि नेटाने कोविड साथीचा मुकाबला करत असतानामहानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने महापालिका आयुक्त डॉ  विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२०-२१  या आर्थिक वर्षात एकूण ४२७.५० कोटी रुपये विक्रमी वसूली केली. आतापर्यंतच्या महापालिकेच्या इतिहासातील करसंकलन विभागातील ही सर्वोच्च वसुली  आहे. 


महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी या बाबीची दखल घेऊन महानगरपालिकेचे करनिर्धारक व संकलक विनय कुलकर्णी करवसुलीत मोलाचा हातभार लावणारे महानगरपालिकेचे दहा प्रभाग क्षेत्र अधिकारी तसेच सदर प्रभागातील  करवसुली अधीक्षक आणि प्रत्येक प्रभागातील उत्कृष्ट वसुली करणारे दोन कर्मचारी यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव  केला.


 कर्मचारी वर्गाने केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या सत्कारामुळे कामाचा हुरूप वाढल्याची प्रतिक्रिया कर्मचारी वर्गाने व्यक्त केली तसेच आयुक्त यांचे आभार मानले.


विक्रमी करवसुली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आयुक्तांनी केला सन्मान विक्रमी करवसुली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आयुक्तांनी केला सन्मान  Reviewed by News1 Marathi on April 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads