Header AD

१६६निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

 कल्याण , कुणाल म्हात्रे  : मानवतेच्या सेवेत सदैव जागरुक राहण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी आदर्श नगर म्युनिसिपल स्कूलवरळी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १६६ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केलेसंत निरंकारी रक्तपेढीकडून रक्त संकलन करण्यात आले.      मिशनला यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या मर्यादा व बंधने पाहता मानव एकता दिवसानिमित्त एकाच दिवशी देशव्यापी रक्तदान श्रृंखलेचे आयोजन करता आले नसले तरी ज्या त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती व गरज लक्षात घेऊन मिशनच्या वतीने ही रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. वरळीचे शिबिर हे त्याचाच एक भाग होता. 


 

            या रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक नगरसेविका तथा माजी उप महापौर हेमांगी वरळीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा बेस्ट समितीचे  सभापती आशीष चेंबूरकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या अन्य मान्यवरांमध्ये माजी आमदार सुनील शिंदे,शिवसेना विभाग प्रमुख हरिष वरळीकर, शिवसेना शाखा प्रमुख सूर्यकांत कोळीआणि सचिन जगदाळे माजी समिती सदस्यनोबेल फाउंडेशन आदिंचा समावेश होता.या प्रसंगी संत निरंकारी सेवादलाचे क्षेत्रीय संचालक शंकर सोनावने यांच्यासह मंडळाचे स्थानिक मुखी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. मंडळाचे स्थानिक ब्रँच मुखी यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.


१६६निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान १६६निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads