Header AD

कोविड लढ्या साठी पालिकेचे प्रभाग निहाय वॉर रूम सज्ज
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना उपचार घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागनिहाय वॉररूम सुरु केले असून या वॉररूमच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना उपचारासाठी उपलब्ध असलेली महापालिका कोविड रुग्णालये, खाजगी रुग्णालये, कोरोना चाचणी केंद्र, रेमेडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची ठिकाणे, प्लाझ्मा मिळणाऱ्या रक्तपेढ्या आदींची माहिती मिळणार आहे.


            कल्याण डोंबिवलीमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन विविध शर्तीचे प्रयत्न करत आहे. तसेच विविध उपाययोजना देखील राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून कोरोना रुग्णांना उपचारासंदर्भात माहिती मिळण्यासाठी पालिकेच्या सर्व प्रभागात वॉररूम सुरु केले आहेत. या वॉररूमच्या माध्यमातून एका फोनवर नागरिकांना आपल्याजवळील कोविड चाचणी केंद्र, कोविड उपचार केंद्र, रेमेडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची ठिकाणे, प्लाझ्मा मिळणाऱ्या रक्तपेढ्या आदींची माहिती उपलब्ध होणार आहे.    


करोना वॉर रूम

अ प्रभाग ९००४९३२८१९

ब प्रभाग ७३०४०५२५४३

क प्रभाग ९१५२२८२४५१

ड प्रभाग ९००४२२७३१३

जे प्रभाग ९१३६८६२८८६

ग प्रभाग ७७१८८१९३८५

एफ प्रभाग - ९१३६५१८९८५

आय प्रभाग ७७१०८३७८७२

ई प्रभाग ७७१८०८७४५३

ह प्रभाग ९०७६३९६७६६

रेमेडेसिवीर इंजेक्शन मिळण्याची ठिकाणे

महापालिका कोविड रुग्णालये

आरोग्य फार्मसीडोंबिवली ८६९१०९१०५५

आशीर्वाद मेडिकल सेंटरडोंबिवली - ९३२२५३१३९७

अमेय फार्मसीकल्याण पूर्व ०८९७६८९३५४५

प्लाझ्मा मिळणाऱ्या रक्तपेढ्या

प्लाझ्मा ब्लड बैंक डोंबिवली ०२५१ -२४३१९३२

अर्पण ब्लड बँक कल्याण-०२५१-२३१०२१०

संकल्प ब्लड बैंक कल्याण ७९४७१७३७९१


कोविड लढ्या साठी पालिकेचे प्रभाग निहाय वॉर रूम सज्ज कोविड लढ्या साठी पालिकेचे प्रभाग निहाय वॉर रूम सज्ज Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads