Header AD

सोशल डिस्टसिंगचे पालन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिकेत साजरी
कल्याण , कुणाल म्हात्रे  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनानिमित्त शासनाच्या नियमांचे पालन करून, सोशल डिस्टसिंगचे पालन करून आज कल्याण पश्चिमेतील, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


             त्याच प्रमाणे महापालिका मुख्यालयातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारउपायुक्त सुधाकर जगतापमहापालिका सचिव संजय जाधव तसेच सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे उपस्थित होत्या.

 

महापालिकेच्या डोंबिवली विभागातही विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांनी डोंबिवली कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि डोंबिवली कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, प्रभाग क्षेत्र अधिकारी, भरत पाटीलसंदीप रोकडे आणि उद्यान अधीक्षक महेश देशपांडे उपस्थित होते.

सोशल डिस्टसिंगचे पालन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिकेत साजरी सोशल डिस्टसिंगचे पालन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महापालिकेत साजरी Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads