Header AD

आदिवासी बांधव खावटी योजने पासून वंचित ; अनुदान लवकरात लवकर देण्याची भाजपची मागणी





भिवंडी  दि ३०(प्रतिनिधी  ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांसह अनुसूचित जमाती , पारधी परितक्त्या , विधवा , कामगार , नरेगा मजूर यांना राज्य शासनाच्या आदिवासी विभागाकडून चार हजार रुपयांचे खावटी अनुदान आदिवासी विकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे . 



           ९ सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने तसे परिपत्रक देखील जाहीर केले आहे . सात महिने उलटून देखील आदिवासी बांधवाना खावटी योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने आदिवासी बांधव या खावटी योजनेपासून वंचित आहेत . आदिवासी बांधवांना प्रति कुटुंब राज्य शासनाकडून चार हजारांचे अनुदान जाहीर करण्यात आले असून त्यात दोन हजार रुपये रोख स्वरूपात तर दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी रूपाने मदत करण्यात येणार आहे . 

        
                मात्र अजूनही हे खावटी अनुदान आदिवासी बांधवांना मिळाले नसल्याने अनुसूचित जमातीतील बांधवांना हे खावटी अनुदान लवकरात लवकर व चार हजार थेट बँक खात्यात जमा करावे अशी मागणी भाजपचे आदिवासी मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शासनाकडे केली असून त्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील घाटाळ यांनी शुक्रवारी भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे दिले आहे .

  
              यावेळी भाजप आदिवासी मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ,भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेश सदस्य संतोष जाधव , आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष तथा भिवंडी पंचायत समिती सदस्य नरेश ठाकरे ,जिल्हा सरचिटणीस भानुदास वाघ , छोटू धोडी, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भावर ,तालुका सचिव रवींद्र मोरे , प्रकाश भुयाळ आदी उपस्थित होते
आदिवासी बांधव खावटी योजने पासून वंचित ; अनुदान लवकरात लवकर देण्याची भाजपची मागणी आदिवासी बांधव खावटी योजने पासून वंचित ; अनुदान लवकरात लवकर देण्याची भाजपची मागणी Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads