Header AD

भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, कोरोना चाचणी आणि रेमडेसिवीर इजेक्शनचे पैसे नागरिकांना देणार.

 भिवंडी दि 29 (प्रतिनिधी ) संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना शासनाने कडक निर्बंध सुद्धा लागू केले असून विविध उपाययोजना शासन करीत आहे मात्र भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथमच अभिनव  असा उपक्रम राबवत असून या उपक्रमामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना चाचणी केली किव्हा रेमडेसिवीर इजेक्शन घेतले असेल तर त्याचे पैसे ओवळी  ग्रामपंचायत देणार असल्याचा उपक्रम राबवत आहे यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून असाच उपक्रम राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने रबावणे गरजेचे बनले आहे.. 


             गेल्या वर्षीच्या पहिल्या   कोरोनाच्या संकटात अजूनही बहुसंख्य गावे सावरली नसताना यावर्षी आलेल्या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत बहुसंख्य गावातील संसार उध्वस्त झाली आहे त्यात शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने खायचं काय, जगायचे कसे आणि कोरोना पासून आपला जीव वाचवायचा कसा आशा अनेक संकटात अनेक गावातील नागरिक सापडले आहेत त्यातच भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायती मध्ये तरुण  सरपंच मनीष धीरज पाटील आणि सदस्य त्याच प्रमाणे गावातील तरुण आणि  जेष्ठ नागरिक यांनी ग्रामपंचायती मध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना चाचणी केली किव्हा रेमडेसिवीर इजेक्शन घेतले असेल तर त्याचे पैसे ओवळी  ग्रामपंचायत देणार असल्याचा उपक्रम राबवण्याचा ठराव  एकमताने घेण्यात आला


             आणि तसे गावातील चौकात गेटवर बॅनर लावण्यात आले आहे त्यामुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून अशाच पध्द्तीने राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने ओवळी ग्रामपंचायती सारखा उपक्रम राबवल्यास कोरोनाने वेठीस आलेल्या नागरिकांना मोठा आधार मिळेल आणि शासनाने याची दखल घेऊन तसे ग्रामपंचायतींना आदेश दिल्यास ग्रामीण भागातील मोठी मदत होईल एवढं मात्र नक्की...

भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, कोरोना चाचणी आणि रेमडेसिवीर इजेक्शनचे पैसे नागरिकांना देणार. भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, कोरोना चाचणी आणि रेमडेसिवीर इजेक्शनचे पैसे नागरिकांना देणार. Reviewed by News1 Marathi on April 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads