Header AD

केडीमसीत २ ते ३ दिवस पुरेल इतकिच लस उपलब्ध आता पर्यंत एक लाख नागरीकांनी घेतली लस ।

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिकाक्षेत्रात लसीकरण मोहिमेला वेग अल असून आतापर्यंत एक लाख नागरिकांनी लस घेतल्या आहेत. लस घेण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढत असून अगदी पहाटेपासून नागरिक रांगा लावत आहेत. सध्याच्या घडीला २ ते ३ दिवस पुरतील अवढंच लसीचा साठा उपलब्ध असून लवकरच लसिंचा साठा मिळणार असल्याचे आरोग्य विभाकडून सांगण्यात आहे.        कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेची १३ तर १३ खासगी लसीकरण केंद्रे आहेत. या सर्वच केंद्रांवर आतापर्यंत एक लाख २ हजार ५०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. याआधी नागरिक लस घेण्यासाठी उत्साही दिसत नव्हते. काही सरकारी तसेच खाजगी ठिकाणी काम करणाऱ्याना लस घेणे महत्वाचे झाल्याने ते लासिकरणकडे वळले. तर जेष्ठ नागरिक देखील लस घेण्यासाठी सकारात्मकता दाखवल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर काही नागरिक अगदी पहाटे पासून रांगा लावत असल्याचे देखील दिसून येत आहे.


 

कल्याण-डोंबिवली शहरात २६ लसीकरण केंद्रे आहेत. त्याठिकाणी पूर्व नोंदणी करून नागरिक लस घेण्यासाठी येत असतात. ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांच्या कुटुंबातील एक जण असतो. त्यामुळे या केंद्रांवर गर्दी होताना दिसून येते. तर काही वेळेस सोशल डिस्टन्सीगचा फज्जा उडल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

केडीमसीत २ ते ३ दिवस पुरेल इतकिच लस उपलब्ध आता पर्यंत एक लाख नागरीकांनी घेतली लस । केडीमसीत २ ते ३ दिवस पुरेल इतकिच लस उपलब्ध आता पर्यंत एक लाख नागरीकांनी घेतली लस । Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads