Header AD

रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार


■कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र....

 

कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :  रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ कल्याणमध्ये आली असून यामुळे  कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.



      कल्याण डोंबिवली कोरोना प्रादुर्भाव वाढला असून रोज हजार सुमारे दीड हजारच्या आसपास रुग्ण वाढत आहे. मात्र मृत्यू दर कमी असून बरे होण्याचे प्रमाण ही मोठे आहे. काही दिवसांपासून कोरोना रुग्णात वाढ झाल्याने पालिका रुग्णालयात जागे अभावी बसण्याच्या आसनावर उपचार केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना महामारीला थट्टेवारी घेऊ नये. नियमांचे पालन करून स्वतःचा जीव तर वाचवाच पण आपल्या मुळे दुसऱ्याला कोरोना प्रादुर्भाव होणार नाही यांचीही काळजी घेण्याचं आवाहन देखील यंत्रणांकडून करण्यात येत आहे.



             कल्याण डोंबिवली शहरा कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असून यात रुग्णालय न मिळाल्याने अनेकांचे हाल होत आहे. कल्याणच्या रुखमणीबाई रुग्णालयामध्ये मध्ये बेड उपलब्ध नसल्याने रूग्णाना रूग्णालयाच्या आवारातच रूग्णांना बसण्याच्या आसनावर ऑक्सिजन लावण्यात आले आहे.



             कोणत्याही रुग्णाचा उपचारा आभावी मृत्यू होऊ नये म्हणून रुग्णांना मिळेल त्या जागी रुग्णालयात उपचार करीत आहोंत. त्याच बरोबर कोरोना रुग्ण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. 
रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads