Header AD

कोपर पुलाचे अंतिम टप्प्यातले गर्डर डोंबिवलीत दाखल

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) गेल्या अनेक महिन्यांपासून डोंबिवलीकरांसाठी चर्चा विषय असलेल्या कोपर पुल अंतिम टप्प्यातले गर्डर डोंबिवलीत दाखल झाले आहे.कोपर पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून औरंगाबाद येथे ज्या ठिकाणी गर्डरची निर्मिती होते,त्या कारखान्यातील काही कामगार दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संक्रमित झाले होतेकाम बंद असल्यामुळे उर्वरित गर्डर येण्यास विलंब झाला गर्डरला जे स्टर्ड (खिळे) बसवतात त्याच्यासाठी वेल्डिंग करावे लागतेआणि या वेल्डिंगला ऑक्सिजनची गरज असतेसध्या सुरू असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे या कामात पुन्हा अडथळा निर्माण झालाहोता.



        परंतु येत्या दोन दिवसात दोन गर्डरच्या खिळ्यांचे वेल्डिंग काम पूर्ण होऊन गर्डर लॉन्चिंगचे काम सुरू होणार आहे.गर्डर लॉन्चिंगनंतर त्या गर्डरवर स्टील प्लेट टाकून नंतर स्लॅबचे काम होईल व डांबरीकरण झाल्यावर कोपर पूल लवकरात लवकर सुरु होणार आहे.कोपर पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे.खासदारडॉ.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कोपर पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी राजेश कदम आणि सागर जेधे यांनी केली.

कोपर पुलाचे अंतिम टप्प्यातले गर्डर डोंबिवलीत दाखल कोपर पुलाचे अंतिम टप्प्यातले गर्डर डोंबिवलीत दाखल Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads