Header AD

भाईंदर पाडा विलगी करणात तत्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी - शानू पठाण


■ कौसा रुग्णालया तून पळविलेले साहित्य केले भंगार जमा...


ठाणे (प्रतिनिधी) -  विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि कार्याध्यक्ष दिनेश बामने यांनी मंगळवारी अचानक भाईंदरपाडा येथील विलगीकरण कक्षाची पाहणी केली. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच कार्यरत नसल्याचे दिसून आले असून म्हाडाच्या वतीने कौसा येथे सुरु केलेल्या रुग्णालयातून लंपास केलेले साहित्य भाईंदरपाडा विलगीकरण कक्षामध्ये भंगारजमा केले असल्याचे दिसून आले.

    

                  या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला असून सदर ठिकाणी तत्काळ वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती न केल्यास गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 


                   मंगळवारी सकाळी  विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि कार्याध्यक्ष दिनेश बामने यांनी भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटरची पाहणी केली. त्यावेळी सदर ठिकाणी कोरोना रुग्णांचे हाल सुरु असल्याचे दिसून आले. येथे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना ठामपाकडून साधे हातमोजेही पुरविण्यात येत नसल्याचे दिसून आले.


                वैद्यकीय साधनांचा प्रचंड तुटवडा दिसून आला. या ठिकाणी मागील वर्षी 12 प्रशिक्षणार्थी डॉक्टर तैनात करण्यात आले होते. मात्र, त्यांचे शिक्षण पूर्ण झाले असून त्यांची या ठिकाणी काम करण्याची तयारी आहे. तरी, त्यांना या ठिकाणी तत्काळ नियुक्त करावे.  , अशी मागणी यावेळी शानू पठाण यांनी केली. तर, या ठिकाणी गरम पाण्याचे यंत्र भंगारात पडलेले असल्याचेही दिसून आले. 


             म्हाडाने दिलेले हे गरम पाण्याचे यंत्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी लंपास केले होते. कौसा येथून हे यंत्र आणून चक्क भंगारात टाकण्याचे काम करण्यात आलेले आहे. तसेच, सफाई कामगारांची संख्याही कमी असल्याने स्वच्छतेचाही बोर्‍या वाजला आहे. या सर्व समस्यांचे तत्काळ निवारण न केल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शानू पठाण आणि विक्रम खामकर यांनी दिला आहे.

भाईंदर पाडा विलगी करणात तत्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी - शानू पठाण भाईंदर पाडा विलगी करणात तत्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी - शानू पठाण Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads