Header AD

खाजगी डॉक्टर , परिचारी कांनी कोरोना उपाय योजनेत पुढाकार घ्यावा...

मुख्यमंत्री यांनी द्यावे निर्देश ठाणे शहर कॉंग्रेसची मागणी...


ठाणे ,  प्रतिनिधी  :  मागील दोन महिन्यापासून ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतच आहे, त्यासाठी महापालिकेची यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे ठाण्यातील वाढत्या कोरोना रूग्णाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी खाजगी वैद्यकीय क्षेत्नातील डॉक्टर,परिचारिका व इतर महत्वाच्या त्यांनी प्रशासकीय उपाययोजने मध्ये पुढाकार घ्यावा अशी मागणी ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस व प्रवक्ता सचिन शिंदे यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील एक निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

          

            राज्यातील किंबहुना ठाण्यातील कोरोना  बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या ठाण्यात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या  रुग्णांची संख्या १६ हजाराहून अधिक आहे.त्यातही ऑक्सीजन,व्हेन्टीलेटरवर देखील अनेक रुग्ण उपचार घेत आहे.रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवरचा तुटवडा जाणवत आहे, ऑक्सीजन कमी पडत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासकीय उपाय योजना,वैद्यकीय सेवा,औषधे अपुरी पडू लागली आहेत.अशा परिस्थितीतही प्रशासनही आपले काम करित आहे.काही कोट्यावधी रुपये खर्च करून कोरोना रूग्णाच्या उपचारासाठी उभारण्यात आलेली रूग्णालय वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टर,तज्ञ,कर्मचारीवर्ग अभावी बंद झालेली आहेत. 


             काही ठराविक खाजगी कोरोना रूग्णालयात देखील जागा कमी पडत आहेत.अनेक कोरोनाबाधित रूग्ण रूग्णालयात जागा मिळत नाहीत म्हणून घरीच विलगीकरणात राहत आहेत.यामुळे हा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे कठीण होऊन बसले आहे.अशा प्रसंगात वैद्यकीय क्षेत्नातील डॉक्टर, परिचारिका,तंत्रज्ञ आरोग्य विषयक काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय वैद्यकीय सेवेत मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कॉग्रेस प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केली आहे.


         तसेच जिल्हाधिकारी व महापालिका अधिकारी यांनीही ज्या ज्या संस्था अथवा वैद्यकीय क्षेत्नातील तंत्नज्ञ यांनी आपल्याकडे सहकार्य, मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,त्यांना तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन त्यांची मदत घ्यावी अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्ष घालून खाजगी डॉक्टर, परिचारीकांना या सेवेत सहभागी होण्यासाठी आवाहन करावे अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

खाजगी डॉक्टर , परिचारी कांनी कोरोना उपाय योजनेत पुढाकार घ्यावा... खाजगी डॉक्टर , परिचारी कांनी कोरोना उपाय योजनेत पुढाकार घ्यावा... Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads