Header AD

अरबी समुद्रा ऐवजी शिव स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्या वर उभारा – मनसे आमदार राजू पाटील
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा हवेत विरल्याचे दिसून येत असून अरबी समुद्रात स्मारक उभारण्यास काही तांत्रिक अडचणी येत असतील तर हे शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.  


छत्रपती शिवाजी महाराजांनी देशावर दुर्गांची मालिका निर्माण करून देश जसा शाश्वत करून घेतला. तसेच आरमार सज्ज करून समुद्रावरही राज्य केलं. जलदुर्गांची शृंखला निर्माण केली. जलदुर्गातील महत्वपूर्ण किल्ला जो स्वतः शिवाजी महाराजांनी निर्माण केला तो सिंधुदुर्ग. शिवकाळातील सिंधुदुर्ग हा एकमेव असा किल्ला आहे जिथे शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. यासाठी म्हणून शिवरायांचं स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्यावर असावे असे आपल्याला वैयक्तिक वाटत असल्याचे राजू पाटील यांनी म्हंटले आहे.


 आज मुंबईत अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या घोषणा हवेतच दिसत आहेतअशावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील व त्या पैश्यातून मालवण परिसरातील रस्ते व इतर सुविधा देतां येतील पर्यायाने कोकणात पर्यटन वाढेल. तिथल्याशिवसागरात’ उभारलेले शिवरायांचे स्मारक हे जगात एकमेवाद्वितीय असे मत देखील राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. 


अरबी समुद्रा ऐवजी शिव स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्या वर उभारा – मनसे आमदार राजू पाटील अरबी समुद्रा ऐवजी शिव स्मारक सिंधुदुर्ग किल्ल्या वर उभारा – मनसे आमदार राजू पाटील Reviewed by News1 Marathi on April 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads