Header AD

९७निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  संत निरंकारी मिशनच्या वतीने बुधवारी संत निरंकारी सत्संग भवनवेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळविलेपार्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ९७ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. मागील मे महिन्यापासून मिशनच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्याद्वारे कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर होण्यास मदत होत आहे. 



       याच भवनमध्ये स्थित असलेल्या संत निरंकारी रक्तपेढीने या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनाचे कार्य पार पाडले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हिन्दु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेन्टर,जोगेश्वरी येथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र बच्छाव यांनी केले. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे अनेक स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ.बच्छाव यांनी संत निरंकारी मिशनच्या वतीने समाज व मानवतेच्या प्रति केल्या जाणाऱ्या निष्काम सेवांची स्तुती केली.



      मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक जयप्रकाश उपाध्याय यांनी स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहयोगाने शिबिरासाठी उत्तम व्यवस्था तयार केली होती.

९७निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान ९७निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads