Header AD

जनतेच्या हितासाठी शिवसेना भाजप मनसेच्या सहकार्याने एकत्रित लसीकरण केंद्र सुरू
डोंबिवली  (शंकर जाधव ) जनतेच्या हिताच्या द्रुष्टीने राजकीय मतभेद दूर ठेवून सेना भाजप मनसे या पक्षांतीतील पदाधिकार्यानी  एकत्र येत, डोंबिवलीतील  रामचंद्र नगर  येथे पालिकेचे लसीकरण केंद्र सुरु केले आहे.रामचंद्र नगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या वतीने १८एप्रिल पासून   लसीकरण सुरु करण्यात आले आहे.येथे लसीकरण सुरु व्हावे याकरिता भाजपचे डोंबिवली पूर्व  उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी पालिकेकडून परवानगी मिळविली आहे.            तळागाळातील लोकापर्यंत लसीकरणाची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने पंढरीनाथ म्हात्रे यांनी शिवसेनेचे कल्याण तालुका अधिकारी प्रतिक पाटील, शिवसेना उपविभाग प्रमुख राहुल कुलकर्णी, मनसेचे विभाग अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, ताम्हणकर  ,शिवसेनेचे पंढरीनाथ  पाटील यांना जनतेच्या हितासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून पुढे येण्याचे आवाहन केले होते.त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तीन पक्षातील पदाधिकारी लसीकरण मोहिमेत सहभागी झाले. सोमवार, बुधवार, शुक्रवार अशी एक दिवसाआड लाभार्थीना लस देण्यात येते.परंतु  पालिकेकडून लस  कुप्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे लस लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने देता येत नाही.             कधी ३००तर कधी ७० लस कुप्या पालिका सकाळी पाठविते .त्याअगोदर लाभार्थी मोठ्या संख्येने रांग लावत असल्याने वितरण कसे करावे असा प्रश्न निर्माण होतो असे पंढरीनाथ म्हात्रे यांनी सांगितले.पालिकने ५००लस  दिवसाआड द्याव्या अशी मागणी सेना उपविभाग प्रमुख राहुल कुलकर्णी यांनी केली आहे.या केंद्रासाठी भाजपचे संजय कुलकर्णी आणि जेष्ठ नगरसेवक मंदार,हळबे यांनी खुप मोलाचे सहकार्य केले आहे. सेना भाजप मनसेचे विविध पदाधिकारी कोणतीही अपेक्षा न बाळगता लसीकरण योग्य रितीने पार पडण्यासाठीमेहनत घेत असल्याचे पंढरीनाथ म्हात्रे यांनी सांगितले.
जनतेच्या हितासाठी शिवसेना भाजप मनसेच्या सहकार्याने एकत्रित लसीकरण केंद्र सुरू जनतेच्या हितासाठी शिवसेना भाजप मनसेच्या सहकार्याने एकत्रित लसीकरण केंद्र सुरू Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads