Header AD

२७गावातील अमृत योजनेच्या कामांना मिळणार गती


■नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली अधिकाऱ्यांसह योजनेच्या कामाची पाहणी.....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये सध्या पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत  झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत २७ गावातील समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अमृत योजनेच्या रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम सुरु केले आहे.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये पाण्याची समस्यां हि गंभीर झाली होती. यासाठी केंद्र शासनाची अमृत योजना २७ गावांसाठी मंजूर करण्यात आली होती. या नंतर या अमृत योजनेच्या कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. मात्र पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यासाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी प्रभागात ठेकेदार आणि महापालिका प्रशासनाला अनेक अडचणी येत होत्या. या साठी स्वता अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रत्यक्ष वेळोवेळी जाऊन समस्या सोडवून कामांना गती देण्यासं मदत केली आहे.


२७ गावातील ग्रामस्थ गावागावातील पाणीरस्ते आणि कचऱ्याच्या समस्यांबाबत नगरसेवक कुणाल पाटील यांना सतत सांगत होते. अखेर पाटील यांनी या समस्यां सोवण्यासाठी सुरु केलेलं पाठपुरावे आता अंतिम टप्प्यात असून लवकरच कल्याण पूर्व आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. अमृत योजना हि केंद्र शासनाची असून त्यामध्ये केंद्र सरकारराज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील खर्च करणार आहे. या योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या नंतर कामाला गती मिळाली असून लवकरच हे काम पूर्ण होईल असा विश्वास ग्रामस्थांना कुणाल पाटील यांनी दिला आहे.


गुरुवारी नगरसेवक कुणाला पाटील यांनी प्रभागात सुरु असेल्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाची पाहणी केली असून लवकरच हे काम पूर्ण होणार असून यासाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित  पवार यांचे दूरध्वनीवरून आभार मानले आहेत.

२७गावातील अमृत योजनेच्या कामांना मिळणार गती  २७गावातील अमृत योजनेच्या कामांना मिळणार गती Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads