Header AD

पोलिसांच्या नाकाबंदीत साडेचार,लाखांचे गोमांस टेम्पोसह जप्त ; दोघांना अटक


 भिवंडी दि 30 (प्रतिनिधी ) पिकअप  टेम्पोतच  सोलापूरवरून  इतर शहरात  विक्रीसाठी जाणारे साडे चार लाख रुपयांचे   गोमांस कोनगाव   पोलिसांच्या  सर्तकतेमुळे  टेम्पोसह   पोलसांनी जप्तकरून चालकासह दोघांना अटक केली आहेमंजूर गफूर मुल्ला  (वय३३राशनिवार पेठ सोलापूर सैफन गफूर शेख  (वय२२रामल्लिकाजुर्ननगरसोलापूर  ) असे अटककेलेल्या आरोपींची नावे आहेतविशेष म्हणजे मार्च २०१५ पासूनगोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही  भिवंडीकल्याणमुंब्रा,ठाणे  मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रकटेम्पोमधून इतरजिल्ह्यासह पर राज्यातून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचेअनेकदा  उघडकीस  आणले आहे


 

 सोलापूरवरून केली जात होती  जनावरांच्या मांसाची वाहतूक.. 

 

भिवंडी तालुक्यातील मुबंई - नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथील  पुलावरून उतरणाऱ्या मार्गावर  कोनगाव   पोलिसांनी  काल रात्रीच्या  सुमारास  नाकाबंदी केली होती. यावेळी एका टेम्पोत  (टेंपो क्रंमाक ,एमएच १२-एल.टी.  ४४५२ )यामध्ये गोमांस  वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन तपासणी करीत असतानाच आयशर टेम्पोच्या  आतमध्ये  पोलिसांनी पहाणीकेली असता,  जनावराचे मास असल्याचे निदर्शनास आलेत्यामुळे पोलिसांनी पशु वैद्यकीय अधिकारी  यांना घटनस्थळी बोलवूनमासाच्या तुकड्याची तपासणी केली असता गोवंश जनावराची कत्तल केलेले  मास असल्याचे निष्पन्न झाले.  त्यांनतर पोलिसांनीबेकायदा जनावरांचे  मास  वाहतूक  केल्याप्रकरणी  पोलीस शिपाईकृष्णा महाले (वय,३३यांच्या फिर्यादीवरून चालकासह त्याच्यासाथीदारावर  कोनगाव पोलीस ठाण्यात  विविध कलमानुसार गुन्हादाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी दिली आहे.  


   

आरोपीकडून १६ लाख ५० हजारांचा  मुद्देमाल जप्त  गोवंश मासाची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो ज्याची किंमत १२लाख  आणि टेंपोतील  लाख ५० हजार रुपये किंमतीचे गोमांसअसा एकूण १६  लाख ५० हजार  रुपयांचा  मुद्देमाल आरोपीकडूनजप्त करण्यात आलाविशेष म्हणजे राज्य शासनाने गाय तसेचगोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चार चाकी वाहनातूनचोरट्या मार्गाने गोवंश मासाची  मोठ्या प्रमाणात वाहतूक होतअसल्याची बाब भिवंडीत वारंवार समोर येत आहेत्यामुळेपोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीना कठोर शिक्षेचीतरदूत करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून केलीजात आहे

पोलिसांच्या नाकाबंदीत साडेचार,लाखांचे गोमांस टेम्पोसह जप्त ; दोघांना अटक पोलिसांच्या  नाकाबंदीत  साडेचार,लाखांचे गोमांस टेम्पोसह जप्त ; दोघांना अटक Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads