Header AD

रुक्मिणीबाई रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्याची कल्याण विकासिनीची मागणी

 

■वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता आयुक्तांना केल्या विविध सूचना...


कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पालिकेचे कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालय त्वरीत कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्याची मागणी कल्याण विकासिनी या संस्थेने केली असून कोरोना रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने इतर काही उपाययोजना राबविण्याच्या सूचना देखील पालिका आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.


वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता येणाऱ्या काळात रुग्णालयाची अत्यंत निकडीचे गरज लागणार आहे. यासाठी महापालिकेचे रुक्मिणी बाई रुग्णालय कोविड रुग्णालय अत्यंत उपयुक्त ठरू शकेलअंदाजे २०० च्या वर बेडची व्यवस्था याठिकाणी होवू शकते आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन व्यवस्था व स्टाफ ही आहे. त्यामुळे किरकोळ लागणारी व्यवस्था करून त्वरीत रुक्मिणी बाई हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्याची मागणी कल्याण विकासिनी संस्थेच्यावतीने माजी नगरसेवक ऍड उदय रसाळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

     

            तर कल्याण पूर्वेत शक्ती धाम येथे तयार असलेले कोविड रुग्णालय सुरू करावे. कल्याण पूर्व येथे किमान ५०० बेड चे कोविड समर्पित रुग्णालय करण्यात यावे. लहान मुलांना संक्रमण होत आहे हे पाहता कल्याण मधे लहान मुलां करीता स्वंतत्र कोविड हॉस्पिटल करण्यात यावे. स्मशान भूमी दाटी वाटीच्या ठिकाणावरून निर्मनुष्य ठिकाणी हलविण्यात यावी,व्यवस्थापन सुधारण्यात यावे आदी मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.

       

           त्याचप्रमाणे इतर नागरिकांनी देखील आयुक्तांना याबाबत सजग करण्यासाठी आयुक्तांना मेसेज, मेल लेखी पत्र पाठवून स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर करत सोशल मिडीयाच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन उदय रसाळ यांनी केले आहे.

रुक्मिणीबाई रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्याची कल्याण विकासिनीची मागणी रुक्मिणीबाई रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्याची कल्याण विकासिनीची मागणी Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads