Header AD

मोहने येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था शौचालयांना दरवाजे नसल्याने महिला वर्गाची कुचंबना

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मोहने येथील महात्मा फुले नगर व विकास कॉलनीच्या रस्त्यालगत असणार्‍या प्रभाग क्रमांक १३ मधील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे व एमएमआरडीएच्या सार्वजनिक शौचालयांची गेल्या दोन महिन्यापासून दुरावस्था झाली असून शौचालयाचे वीस दरवाजे लंपास केल्याने महिला वर्गाची येथे मोठी कुचंबणा होत आहे.


नोव्हेंबर २०२० रोजी राजकीय राजवट संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. याठिकाणी विभागातील महिला व पुरुष वर्ग शौचालयाचा वापर करीत होते. एक मजल्याचे असणारे हे शौचालय दहा सीट स्त्रियांसाठी दहा सीट पुरुषांसाठी बांधण्यात आले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून शौचालयाचे दरवाजे गायब झाल्याने प्रांत विधी करता महिलावर्गाची कुचंबना झाली आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका देखील त्या सर्वांच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप येथील महिला वर्गाने केला आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अनंत मांडगुंडी यांना शौचालय दुरवस्थेबाबत विचारले असता दुरुस्तीबाबत कुठली निविदा मंजूर झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. संदर्भित परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे.


याबाबत या प्रभागाचे शिवसेनेचे नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांना विचारले असता शौचालयाचे वीस नवीन दरवाजे आपण स्वखर्चाने येत्या आठवड्याभरात बसवून देणार असल्याचे सांगितले.

मोहने येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था शौचालयांना दरवाजे नसल्याने महिला वर्गाची कुचंबना मोहने येथील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था शौचालयांना दरवाजे नसल्याने महिला वर्गाची कुचंबना Reviewed by News1 Marathi on April 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads