Header AD

संचार बंदीची ऐशी की तैसी करीत हळदी सभारंभात नाचविला बैल

 

■बैलावर पैसे उडवित केली पैशाची उधळण हळदी समारंभास मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती कल्याण मधील चिचं पाडा गावात घडला प्रकार....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता लाँकडाँऊन निर्बंध सुरू असुन राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत संचारबंदी आहे की नाही असा सवाल काही घटनांमुळे उपस्थित होत आहे. कुठे आठवडा बाजार,  कुठे बारमध्ये बसून मद्यपान केले जात आहे. आणि आत्ता तर मोठय़ा जल्लोषात हळदी सभारंभ आयोजित करण्यात आला.


या हळदी सभारंभात बैल नाचविले गेले. त्यावर पैशाची उधळपट्टी करण्यात आली. या हळदी सभारंभात शेकडो लोक उपस्थित होते. कल्याण पूर्व भागातील चिंचापाडा गावात हा कार्यक्रम होता. या गावातील रहिवासी प्रकाश म्हात्रे यांचा मुलगा वैभव याचा हळदी कार्यक्रम होता. 


लग्नसमारंभासाठी २५ लोकांची उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडावेत असे असताना नियमांची पायमल्ली होत मोठ्या संख्येने लोक कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहत असतील तर दुर्दैव म्हणावे लागेल. आय प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे संपर्क साधला असता सांगितले.       

                             

 मात्र नागरीकांना कोरोना आणि कायदयाची भिती राहिली नाही. अशामुळे कोरोना आवर कसा लागणार, या लोकांचे करायचे काय असा यानिमित्ताने सवाल उभा ठाकला असल्याचे चित्र दिसत आहे.

संचार बंदीची ऐशी की तैसी करीत हळदी सभारंभात नाचविला बैल संचार बंदीची ऐशी की तैसी करीत हळदी सभारंभात नाचविला बैल Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads