Header AD

औद्योगिक कामगारां साठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे खासदार कपिल पाटील यांची मागणी




भिवंडी, दि. १५ (प्रतिनिधी) : भिवंडी, कल्याण, वाडा, मुरबाड औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.



                     भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण, भिवंडी ग्रामीण, कोन गाव, वाडा, मुरबाड आदी ठिकाणी एमआयडीसी स्थापन करण्यात आली आहे. तर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमधील कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. भिवंडीत सुमारे  २ ते ३ लाख कामगार असून, अन्य ठिकाणांमधील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. या कामगारांना चाचणी करण्यासाठी विशिष्ट हॉस्पिटलमध्ये सुविधा दिली आहे. मात्र, त्या ठिकाणी कामगारांच्या मोठ्या रांगा लागत आहेत, याकडे खासदार कपिल पाटील यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.



                   राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे कामगारांना आरटीपीसीआर चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय कामगारांना कामाच्या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. मात्र, आरटीपीसीआर केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर चाचणी केंद्राच्या परिसरात दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर भिवंडी, वाडा, मुरबाड आदी एमआयडीसी क्षेत्रात नवीन चाचणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली आहे.


---------------------
१०० हून अधिक कामगारांच्या  कंपनीत लसीकरण केंद्र ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील १०० हून अधिक कामगार असलेल्या कंपनीत लसीकरण केंद्र सुरू करावे. त्यातून वेगाने लसीकरण केले जाईल, अशी सुचनाही खासदार कपिल पाटील यांनी पत्रात केली आहे.
औद्योगिक कामगारां साठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे खासदार कपिल पाटील यांची मागणी औद्योगिक कामगारां साठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे खासदार कपिल पाटील यांची मागणी Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads