Header AD

वेदांत हॉस्पिटल मध्ये झालेल्या दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
ठाणे , प्रतिनिधी   :-  ठाण्यातील वेदांत रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झालाय. या घटनेची चौकशी करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. 


आज ही दुर्घटना घडल्यानंतर  श्री. शिंदे यांनी तातडीने या घटनेची दखल घेत वेदांत रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाकडून ही घटना नक्की कशी घडली याची माहिती घेतली. सदर घटना ही दुदैवी असली तरीही यात नक्की चूक कुणाची ते शोधून काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


या समितीमध्ये आयएएस दर्जाचे अधिकारी असणारे भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, ठाण्याचे सिव्हिल सर्जन आणि अन्य चार डॉक्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आजच्या आज या घटनेची चौकशी करून आपला अहवाल प्रशासनाला सादर करेल.  या अहवालात जे कुणी दोषी ठरेल त्याच्यावर कठोर कारवाई करू असं श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.  


दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे चारही पेशनट्स क्रिटिकल असल्याने ते दगवल्याचा दावा केला आहे. तर रुग्णाच्या नातेवाईकांनी आपले नातलग काल संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होते, मात्र आजच ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. अखेर या घटनेमागील सत्य शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 


एमएमआर क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतील फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन सेफ्टीचे त्रयस्थ तज्ञ संस्थेमार्फत होणार ऑडिट


सरकारी आणि खाजगी रुग्णालयात आग लागणे किंवा ऑक्सिजन लिक झाल्याने घडणाऱ्या दुर्घटना घडत असल्याच निदर्शनास आले आहे. या दुर्घटनांमध्ये रुग्णांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील सर्वच रुग्णालयाचे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांच्या देखरेखीखाली त्रयस्थ तज्ञ संस्थेमार्फत फायर, इलेक्ट्रिक आणि ऑक्सिजन सेफ्टी ऑडीट करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज वेदांत रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वेदांत हॉस्पिटल मध्ये झालेल्या दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश वेदांत हॉस्पिटल मध्ये झालेल्या दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads