Header AD

चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर


अॅपची ‘कडक एंटरटेनमेंट’सोबत भागीदारी ~


मुंबई, २१ एप्रिल २०२१ : चिंगारी या भारतातील प्राइम व्हिडिओ-शेअरींग अॅपने आज कडक एंटरटेनमेंटसोबत करार केल्याची घोषणा केली. श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्नील मुनोत या दोन महिला उद्योजिकांनी स्थापन केलेल्या कडक एंटरटेनमेंटने तीन महान प्रॉपर्टी तयार केल्या असून त्याद्वारे मराठी प्रेक्षकांसाठी विविध विषय आणि शैलींचा कंटेंट प्रदान केला जातो.


            या अनोख्या जोडीच्या नव्या कामगिरीचा लाभ चिंगारीवर घेता येईल तसेच या भागीदारीतून प्रादेशिक कन्टेन्ट  लायब्ररीही अधिक समृद्ध केली जाईल. हे शॉर्ट व्हिडिओ अॅप प्रादेशिक अस्तित्व अधिक बळकट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कडक एंटरटेनमेंटसोबतची ही भागीदारी म्हणजे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.


            चिंगारी अॅपचे सह संस्थापक आणि सीईओ सुमित घोष म्हणाले, “रुढी-प्रथा मोडत, आमच्या यूझर्ससाठी सर्वोच्च  क्षमतेने उत्कृष्ट मनोरंजन पुरवणे, ही चिंगारीची ब्रँड फिलॉसॉफी आहे. कडक एंटरटेनमेंटची तत्त्वेही अशीच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही स्वाभाविकरित्या जोडले जाऊ शकतो. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”


          कडक एंटरटेनमेंटच्या श्रुती अक्षय मुनोत आणि मयुरी स्वप्निल मुनोत म्हणाल्या, “ही भागीदारी करताना, विशेषत: विनोदी कॉन्टेन्टसाठी आम्ही खूप उत्साही आहोत.  कडक मराठीकडे कॉन्टेन्ट निर्मितीसाठी अनेक योजना असल्याने चिंगारीच्या यूझर्सचे आणखी मनोरंजन होईल, याची आम्ही खात्री देतो. 


        तसेच चिंगारी अॅपसोबत अनेक उपक्रमही आम्ही राबवणार आहोत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त मनोरंजनाकरिता कडक मराठीचा ताजा कॉन्टेन्ट चिंगारी अॅपच्या विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी दीर्घकालीन संबंधांची ही एक महत्त्वपूर्ण सुरुवात आहे.”

चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर Reviewed by News1 Marathi on April 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads