Header AD

रक्तदानातून बाबासाहेबांना वाहिली अनोखी आदरांजली

 

■राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या रक्तदान शिबिरात ११८ युनिट रक्तदान....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत कल्याणमध्ये बाबासाहेबांना रक्तदान करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने अनोखी आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदिप देसाई, कार्याध्यक्ष उदय जाधव यांनी रामदास वाडी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ११८ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.


कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार  यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकल्याण (प) च्या वतीने बुधवारी माळी समाज सभागृहरामदास वाडीकल्याण(प). येथे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात संकल्प ब्लड बँकेने रक्तसंकलनाचे कार्य केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदेकार्याध्यक्ष वंडार पाटील,  कल्याण(प.) विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई, कार्याध्यक्ष उदय जाधव, कला,सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे, ब प्रभाग अध्यक्ष भगवान साठे क प्रभाग अध्यक्ष दिनेश परदेशी, अ प्रभाग अध्यक्ष गणेश कोनकर, अण्णा तरे, माजी नगरसेवक जे.सी.कटारीया, विनायक काळण, जिल्हाउपाध्यक्ष रामदास वळसे पाटील, जनार्दन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रशांत माळी, विधानसभा युवा अध्यक्ष योगेश माळी, ऊल्केश पवारशैलेश जोगदंडसमीर वानखडेअँड. प्रल्हाद भिलारे, रमेश रोकडे, रेखा सोनवणे सुनीता देशमुख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्ता उपस्थित होते.

रक्तदानातून बाबासाहेबांना वाहिली अनोखी आदरांजली रक्तदानातून बाबासाहेबांना वाहिली अनोखी आदरांजली Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads