Header AD

लॉकडाऊनच्या पार्श्व भूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाय योजना
मुंबई, १६ एप्रिल २०२१ : कोव्हिड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेला आळा घालण्याकरिता राज्य सरकारने लॉकडाऊनसदृश्य नियमावलीही जाहीर केली आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत सरकारद्वारे लावण्यात आलेल्या नव्या निर्बंधांना सामोरे जाण्यासाठी विविध व्यवसाय तयारी करीत असून फुल स्टॅक ई कॉमर्स सक्षमता स्टार्टअप, मुंबईतील वेअरहाऊसना सज्ज करत आहे.


                  एएनएस कॉमर्सने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून यात थर्ड पार्टी एजन्सीच्या मदतीने बॅक अप मॅनपॉवरचे नियोजन करणे, टीममधील सदस्यांच्या शरीराचे तापमान नियमित तपासणे, टीमच्या प्रवासाकरिता वेअरहाऊसपर्यंत आणि तेथून पुढे कॅब सर्व्हिस पुरावणे इत्यादींचा समावेश आहे. कंपनीने गोदामांच्या वेळातही बदल केला असून ते आता सकाळी ७.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यरत असतील. पिकअपच्या टाइमिंगसाठी लॉजिस्टिक पार्टनर आणि मार्केटप्लेसचा मेळ घालणे आणि अल्टरनेट दिवसांमध्ये सेवा देण्यायोग्य पिनकोड अपडेट करणे इत्यादी उपाय करण्यात आले आहेत.


            तसेच, मुंबईतील गोदामांमध्ये येणारा सर्व माल दिवसाच्या पहिल्या अर्ध्या वेळात येतो आणि ५.०० वाजेपर्यंत तो उतरवून घ्यावा लागतो, हे लक्षात घेता एएनएस कॉमर्स ही स्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधित कामे करण्यासाठी अधिकृत पत्रही मिळवली आहेत. या वेगाने वाढणाऱ्या प्लॅटफॉर्मने कर्मचाऱ्यांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठीही तयारी केली असून कामे निरंतर सुरु राहण्यासाठी वेअरहाऊसमधील कर्मचाऱ्यांकरिता लसीकरण मोहीम सुरु करण्याचीही योजना आखली आहे.


एएनएस  कॉमर्सचे सीईओ आणि सहसंस्थापक विभोर सहारे म्हणाले, “अनेक व्यवसाय नुकतेच सुधारणेच्या मार्गावर असताना महामारीची दुसरी लाट सुरु होणे, हे दुर्दैवी आहे. मात्र एएनएस कॉमर्सने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकरिता सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही अडथळ्याविना त्यांना दैनंदिन कामे करता येतील. काही ब्रँड्स बॅकअपचा पर्याय म्हणून आपली गोदामे दिल्ली आणि बंगळुरूत हलवण्याचा विचार करत आहेत तर इतर अजूनही मुंबईतील गोदामांवर विश्वास ठेवून आहेत. मात्र व्यवसाय नेहमीप्रमाणेच चालू राहिली, अशी हमी आम्ही देत आहोत.”


            एएनएस कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर १०० पेक्षा जास्त सक्रिय ब्रँड्स असून हा वेगाने वाढणारा प्लॅटफॉर्म बाथ अँड बॉडी वर्क्स, निव्हिया, मार्स, बिकानेरवाला, जॅक अँड जोन्स, सीएट, पिरामल, मॅरीको आणि आयटीसी यासारख्या ब्रँडसोबत काम करतो.

लॉकडाऊनच्या पार्श्व भूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाय योजना लॉकडाऊनच्या पार्श्व भूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाय योजना Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शहरातील फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

    ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज शहरातील विविध ठिकाण...

Post AD

home ads