Header AD

एशियन पेंट्सचा फर्निशिंग क्षेत्रामध्‍ये प्रवेश


सब्‍यासाची सोबत सहयोगाने भारताची डिझाइनर होम फर्निशिंगची पहिली श्रेणी सादर 


■होम फर्निशिंग नेटवर्कमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी दि प्‍युअर कन्‍सेप्‍टसोबत सहयोग ..


राष्‍ट्रीय, १६ एप्रिल २०२१ :  वर्ष २०२० ने आपल्‍या सर्वांना एक गोष्‍ट करण्‍यास भाग पाडले, ती म्‍हणजे आपण सर्वांनी घरीच अधिक वेळ व्‍यतित केला. ज्‍यामुळे अनेक लोकांनी त्‍यांच्‍या घराच्‍या सजावटीमध्‍ये आकर्षक सुधारणा करण्‍याचा विचार केला आणि त्‍यांनी या गोष्‍टीला नेहमीपेक्षा अधिक प्राधान्‍य दिले. 


                  होम फर्निशिंगने नेहमीच जलदपणे घराच्‍या सजावटी मध्‍ये आकर्षक बदल करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विभागातील ही वाढती मागणी लक्षात घेत एशियन पेंटसने ब्रॅण्‍ड निलाया अंतर्गत डिझाइनर होम फर्निशिंग्‍सची अद्वितीय श्रेणी सादर करण्‍यासाठी भारताचे सर्वात सुप्रसिद्ध डिझाइनर सब्‍यासाचीसोबतचा सहयोग अधिक दृढ केला.  


                 सब्‍यासाची यांचे कौशल्‍ये विविध अनुभवांमधील त्‍यांच्‍या पहिल्‍याच होम फर्निशिंग कलेक्‍शनमधून दिसून येतात. या कलेक्‍शनमध्‍ये कोरोमंडल कोस्‍टमधून कुशलपूर्वक प्रिंट केलेले फॅब्रिक्‍स, प्राचीन विश्‍वामधील भरतकाम, प्राचीन कलकत्तामधील फेडिंग लक्‍झरी आणि मुर्शीदाबाद युगामधील लघुचित्रकारांची परंपरा यांचा समावेश आहे. 


            एशियन पेंट्सने होम फर्निशिंग क्षेत्रामधील त्‍यांची उपस्थिती अधिक दृढ करण्‍यासाठी आघाडीचा प्रिमिअम फर्निशिंग ब्रॅण्‍ड दि प्‍युअर कन्‍सेप्‍टसोबत देखील सहयोग केला आहे. चान्‍या कौर व दलबीर सिंग यांनी २०१२ मध्‍ये संयुक्‍तपणे स्‍थापना केलेला ब्रॅण्‍ड दि प्‍युअर कन्‍सेप्‍टने घरांसाठी त्‍यांच्‍या अद्वितीय फर्निशिंग फॅब्रिक्‍समधील महत्त्वपूर्ण स्रोत म्‍हणून दर्जा व सर्जनशीलतेसह जागतिक स्‍तरावर यशस्‍वी ब्रॅण्‍ड म्‍हणून टप्‍पा गाठलेला आहे. 


           या सहयोगाचा भाग म्‍हणून दोन्‍ही ब्रॅण्‍ड्स – प्‍युअर फाइन फर्निशिंग आणि दि प्‍युअर कन्‍सेप्‍ट यांच्‍या अनुक्रमे रॉयल व निलायासह एकसमान होण्‍यासाठी त्‍यांच्‍या ब्रॅण्‍डमध्‍ये सुधारणा करत आहेत. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून एशियन पेंट्स या श्रेणींची संपूर्ण विक्री व विपणनाचे व्‍यवस्‍थापन करेल, तर दि प्‍युअर कन्‍सेप्‍ट डिझाइन व उत्‍पादनावर लक्ष केंद्रित करेल. 

एशियन पेंट्सचा फर्निशिंग क्षेत्रामध्‍ये प्रवेश एशियन पेंट्सचा फर्निशिंग क्षेत्रामध्‍ये प्रवेश Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads