Header AD

उद्धव ठाकरेंनी १ मे पासून लसीकरण करून दाखवावं - किरीट सोमैय्या

 

ऑक्सिजनची कमतरता व रेमडीसीवरचा तुटवडा यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलं , चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील , भाजप नेते किरीट सोमय्या यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले चॅलेंज.....


कल्याण  , कुुुणाल म्हात्रे  ;  केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे करोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू होणार नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितल. याबाबत किरीट सोमैय्या यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीका केली असून  लसीकरणा बाबत ठाकरे सरकारचं नियोजन नाहींआधी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री केंद्राकडे बोट दाखवत होते, आम्हाला इम्पोर्ट करण्याची परवानगी मागत होते आता केंद्राने परवानगी दिली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दाखवावं असा आव्हान केलं आहे.


आज कल्याणमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पाहणी दौरा होता. या दरम्यान खाजगी आणि सरकारी कोवीड रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  कोविड रूग्णालयासंदर्भात आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ऑक्सीजन मिळत आहे. मात्र खाजगी रुग्णालयांना ऑक्सीजन मिळत नसल्याने खाजगी रुग्णालयांनी क्षमता ५० टक्के केलीय. त्याचबरोबर महापालिका हद्दीत रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मागणीच्या तुलनेत केवळ २० टक्केच रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. एमएमआर रिजन मध्ये एप्रिल महिन्यात मृत्यू वाढलेत. ऑक्सिजनची कमतरता व रेमडीसीवरचा तुटवडा यामुळे मृत्यूचे प्रमाण जानेवारीच्या तुलनेत १० पटीने वाढल्याचं त्यांनी सांगीतले.


उद्धव ठाकरे हे भयंकर भयभीत झाले आहेत. या सरकारमधील सहा बडे नेते २ हजार कोटींच्या वसुलीप्रकरणी येत्या ४ महिन्यात सीबीआयच्या दारात उभे असतील. सीबीआयने रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु केली आहे. एफआयआरमध्ये अनिल परब यांचेही नाव आहे. ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. ठाकरे सरकार परमवीर सिंग रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणत आहे. येत्या चार महिन्यात ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळातील सहा सहकारी सीबीआरच्या दारात असलीत असे खुले आव्हान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी १ मे पासून लसीकरण करून दाखवावं - किरीट सोमैय्या उद्धव ठाकरेंनी १ मे पासून लसीकरण करून दाखवावं - किरीट सोमैय्या Reviewed by News1 Marathi on April 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads