Header AD

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल


■तर डोंबिवली पुर्व व पश्चिमेत नविन स्मशान भुमीची आयुक्तां कडे मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे : मुंबई आणि पुण्यात महापौरपालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्रठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेतअसा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. आमदार राजू पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना हा प्रश्न उपस्थित केला.


कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आमदार राजू पाटीलडोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केडीएमसी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भेट घेत काही सूचना केल्या. लसीकरण काही केंद्रांवर सुरु आहे. मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होतात. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाहीअशी सूचनाही त्यांनी केली.


डोंबिवली मधील शिवमंदिर ची स्मशानभुमी ही मध्यवर्ती भागांत आहे. सध्या कोरोनामुळे होणार्या मृत्युंमुळे या स्मशानभुमीवर प्रचंड ताण येत आहे. त्या स्मशानभुमी मध्ये सुद्धा रांगा लागल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. यामुळे डोंबिवली पुर्वेला व पश्चिमेला अद्ययावत स्मशानभुमी उभारावी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांकडे केली. 


आयुक्तांनी यांवर सकारात्मक प्रतिसाद देताच आमदारांनी तात्काळ नगररचना विभागाचे प्रमुख मा.द.राठोड यांची भेट घेतली.यांवर तात्काळ पाहणी करुन जागा निश्चीती करावी व सदरचा प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांना पाठवावा व सदर स्मशानभुमी साठी आमदार निधी तात्काळ उपलब्ध करुन देऊ असे या बैठकीत आमदार राजु पाटील यांनी सांगितले.


तर मुंबई आणि पुण्यात महापौरपालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनीही आढावा बैठक घेण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल Reviewed by News1 Marathi on April 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads