Header AD

डोंबिवली तील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्या साठी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट

   कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  डोंबिवली शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि तोकडी पडणारी यंत्रणा पाहता सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली आहे.  डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्रां'तर्गत हे सर्व जण एकत्र आले असून त्यांनी महापालिकेच्या कोवीडविरोधी लढ्यात हातभार लावण्याचा विडा उचलला आहे.


दिवसेंदिवस खराब होणारी डोंबिवलीची परिस्थिती पाहता डोंबिवलीतील शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांनी इतर पक्षीय नेत्यांना एकत्र येण्याची साद घातली. आणि इतर पक्षीय नेत्यांनीही आपापले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सदानंद थरवळ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जितेंद्र भोईरनंदू म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेसचे नंदू मालवणकरमनसेचे प्रकाश मानेभाजपचे नंदू परब आणि आरपीआयचे किशोर तांबे यांनी एकत्रित येत आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेत चर्चा केली.


सध्या कोवीड पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ सुरू आहे. बेड कुठे मिळेलइंजेक्शन कुठे मिळेलप्लाझ्मा कुठे मिळेलऍम्ब्युलन्स कुठे मिळेलकोवीड टेस्ट कुठे करायचीलसीकरण कुठे सुरू आहेयांसारख्या असंख्य प्रश्नांनी डोंबिवलीकर सध्या हैराण झाले आहेत. याबाबत नेमकी कुठे माहिती मिळेल याचीच अनेकांना माहिती नसल्याने या डोंबिवली सर्वपक्षीय कोवीड मदत केंद्राची स्थापना करत असल्याचे सदानंद थरवळ यांनी सांगितले. या केंद्रांतर्गत सुरू होणाऱ्या वॉर रूममध्ये डोंबिवलीकरांना आवश्यक असणारी सर्व महत्वपूर्ण माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही थरवळ म्हणाले.


तर महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या एकत्रित राजकीय पुढाकाराचे स्वागत आणि कौतुकही केले आहे. आमची आज सकारात्मक चर्चा झाली असून महापालिका प्रशासनाने या सर्वांची मदत घेण्याचे निश्चित केल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.


डोंबिवली तील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्या साठी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट डोंबिवली तील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्या साठी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली आयुक्तांची भेट Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads