Header AD

प्रवाशां कडून पैसे उकळणारा बोगस टीसी गजा आड

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मेल एक्स्प्रेस मध्ये प्रवाशांना गंडा लावून पैसे उकळणाऱ्या बोगस टीसी ला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ माळी असे या बोगस टीसीचे नाव असून त्याला यावेळी बुधवारी कामायनी एक्स्प्रेस मध्ये पकडले आहे.


बुधवारी दुपारी जेव्हा सोमनाथ प्रवाशांचे तिकीट चेक करत होता. तेव्हा काही लोकांना याच्यावर संशय आला. विचारपूस केली असता सोमनाथ घाबरलात्याने प्रवाशांकडून घेतलेले पैसे आणि बोगस रिसीट ट्रेन बाहेर फेकली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सोमनाथ हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याचा रहिवासी आहे. 


तो कधीपासून हा प्रकार करत होता याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र विदाऊट आयकार्ड आणि विदाऊट तिकीट रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात नाही असे असताना हा रेल्वे मध्ये कसा घुसला हा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रवाशां कडून पैसे उकळणारा बोगस टीसी गजा आड प्रवाशां कडून पैसे उकळणारा बोगस टीसी गजा आड  Reviewed by News1 Marathi on April 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads