Header AD

भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपाला काम करण्याची संधी द्या - माजी आमदार नरेंद्र पवार


■नरेंद्र पवार यांच्या दौऱ्यामुळे भटके विमुक्त समाजात उत्साह वाढला...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मंगळवेढा तालुका हा सातत्याने दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो,  देशाला स्वातंत्र्य मिळून ७०  वर्षे झाली मात्र अजूनही मंगळवेढ्याच्या ३५ गावांना हक्काचं पाणी मिळू शकलं नाही. आज भटके विमुक्त समाज मोठ्या प्रमाणात आहेत्यांच्या प्रचंड समस्या आहेतना हक्काचं घर आहेना रोजगारना कोणत्या सुविधा आहेत. ही निवडणूक खऱ्या अर्थाने भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची आहेभाजपाला समाधान आवताडे यांच्या रूपाने काम करण्याची संधी द्या असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विविध ठिकाणी बैठकीत बोलताना केले.


भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा आणि संवेदना लक्षात घेऊन काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. येणाऱ्या समाजाची भटकंती थांबली पाहिजेयेणाऱ्या पिढीचं उज्वल भविष्य घडवलं पाहिजेहक्काचं घर मिळालं पाहिजेत्यांना किमान भौतुक सुविधा मिळाल्या पाहिजेतही निवडणूक घराणेशाहीच्या विरोधात लोकशाहीची निवडणूक आहेपरिवर्तनाची संधी चुकवू नका असेही भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार बोलताना म्हणाले.


या दौऱ्यात कैकाडी, धनगर, वडार, बंजारा, नागपंथी, डवरी, मरी आई वाले, गोसावी, काशी कापडी, गवळी, वंजारी आदी समाजाच्या वस्त्यांमध्ये जात संपर्क केला. दरम्यान मच्छिंद्र भोसले यांचीही भेट घेतली, समाधान आवताडे यांना सक्रिय पाठिंबा असल्याचे सांगितले, तसेच मंगळवेढा पंढरपूर परिसरातील भटके विमुक्त समाज बांधवांच्या भेटी  घेत मतदानाचा आवाहन करणार असल्याचेही सांगितले.

भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपाला काम करण्याची संधी द्या - माजी आमदार नरेंद्र पवार भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपाला काम करण्याची संधी द्या - माजी आमदार नरेंद्र पवार Reviewed by News1 Marathi on April 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads