Header AD

चेन्नई एक्सप्रेस मधून अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून पळविणारा आरोपी जाळ्यात
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : राजस्थान मध्ये राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या बालपणाचा फायदा घेतप्रेमाच्या जाळ्यात अडकून  अहमदाबादवरून  चेन्नई एक्सप्रेसमधून पळून घेऊन जाणाऱ्या आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एसी डब्यात सापळा रचून कल्याण रेल्वे स्थानकातून आरोपीला पीडित मुलीसह ताब्यात घेतले  आहे. सादिक खान असे आरोपीचे नाव असून त्याला आज दुपारच्या सुमारास पीडित मुलीसह राजस्थान राज्यातील जालोर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


        आरोपी सादिक व पीडित मुलगी हे दोघेही राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आरोपी सादिक हा विवाहित असून तो एका मुलाचा बाप देखिल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने आधी पीडित मुलीच्या बालमनाचा फायदा घेऊन तिला प्रेमाच्या आना भाका देऊन जाळ्यात अडकवले. त्यांनतर १६ एप्रिल रोजी तिचे अपहरण केले होते. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण केल्याची नोंद केली असता जालोर पोलिसांनी पीडितेचा तपास सुरु केला. मात्र दुसऱ्या दिवशी आरोपी पीडितेला अहमदाबाद येथे घेऊन आला. अहमदाबादच्या एका हाँटेलमध्ये मुक्काम करून त्याच दिवशी  अहमदाबादवरून  चेन्नई एक्सप्रेसमधून दोघे पुढील प्रवासासाठी निघाले होते.


 कल्याणच्या लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह फौजदार मोहन घास्टे यांना कल्याण स्टेशनवरील चेन्नई एक्स्प्रेस येणाऱ्या फलाटावर सापळा लावल्यास सांगितले.  त्यानंतर काही  वेळात  कल्याण स्टेशनमध्ये  चेन्नई एक्स्प्रेस  थांबली असता,  फौजदार घास्टे आणि त्यांच्या पथकाने एसी कंपार्टमेंटचा शोध घेत,  आरोपी सादिक खान हा त्या अल्पवयीन मुलीसह बसला होता. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले.


चौकशीदरम्यान हे दोघे राजस्थानमधून पलायन करून अहमदाबादला आले.  आणि तेथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी सांगितले कीहे दोघे अहमदाबादहून चेन्नईला जात होते. माहिती मिळताच आमच्या पथकाने कल्याण स्टेशनवर दोघांना पकडले. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर तातडीने ही माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली. रविवारी राजस्थान पोलिस आल्यानंतर या मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू होते.  कायदेशीर प्रक्रियेनंतर जालोर कोतवाली येथील जमादार भगीरथ बिष्णोई यांच्या ताब्यात देण्यात आले.

चेन्नई एक्सप्रेस मधून अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून पळविणारा आरोपी जाळ्यात चेन्नई  एक्सप्रेस मधून अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून पळविणारा आरोपी जाळ्यात Reviewed by News1 Marathi on April 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads