Header AD

जेष्ठ नागरिकांच्या मदती साठी प्रभाग स्तरावर स्वयं सेवकांची नेमणूक
■प्रभाग अधिकाऱ्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचे आवाहन.....


कल्याण : वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन ज्या घरात फक्त जेष्ठ नागरिक राहत आहेत अशांना अनेक जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. अशा जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी प्रभाग स्तरावर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून ज्या जेष्ठ नागरिकांना हि मदत हवी आहे त्यांनी आपल्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी त्यांच्या प्रभाग स्तरावर स्वयंसेवकांची नेमणूक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. या स्वयंसेवकांनी त्यांच्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच पोचविण्याचे काम करायचे आहे.

जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना जेष्ठ नागरिकांपर्यंत होम डिलिव्हरी उपलब्ध करून देण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यास सदर दुकानदारांनी स्वयंसेवक उपलब्ध करून घेणेकामी संबंधित प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्याशी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे मार्फत करण्यात आले आहे.

 

 प्रभाग क्षेत्र अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे

1/अ प्रभागक्षेत्र अधिकारी

राजेश सावंत - 9819504304

 

2/ब प्रभागक्षेत्र अधिकारी

चंद्रकांत जगताप - 9867727361

 

3/क प्रभागक्षेत्र अधिकारी

अक्षय गुडधे - 8411088964

 

4/जे प्रभागक्षेत्र अधिकारी

वसंत भोंगाडे - 9969336832

 

5/ड प्रभागक्षेत्र अधिकारी

सुधिर मोकल - 9594837731

 

6/फ प्रभागक्षेत्र अधिकारी

भरत पाटील - 9967914383

 

7/ह प्रभागक्षेत्र अधिकारी

सुहास गुप्ते - 9819411491

 

8/ग प्रभागक्षेत्र अधिकारी

संदीप रोकडे - 9869463280

 

9/आय प्रभागक्षेत्र अधिकारी

दिपक शिंदे - 9890571391

 

10/ई प्रभागक्षेत्र अधिकारी

भारत पवार - 8356888300


जेष्ठ नागरिकांच्या मदती साठी प्रभाग स्तरावर स्वयं सेवकांची नेमणूक जेष्ठ नागरिकांच्या मदती साठी प्रभाग स्तरावर स्वयं सेवकांची नेमणूक Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads