Header AD

भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाच उपसमित्यांवर स्विकृत सदस्यांची निवड

भिवंडी दि. ८ (प्रतिनिधी )  भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समितीने पाच उप समित्या नेमल्या असून सदर उपसमित्यांवर संचालक मंडळाचे ४ सदस्य आणि १ स्विकृत सदस्यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. या उपसमित्यांचे स्विकृत केलेल्या सदस्यांना बुधवारी नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप बाजार समितीचे सभापती विश्वनाथ बाळाराम म्हात्रे उर्फ विशू भाऊ यांचे हस्ते करण्यात आले. 


            या पाच उपसमित्यांवर ऍड शशिकांत पदू गोतारणे मु. ( वडवली) , प्रभाकर अनंत म्हात्रे (  गुंदवली ) हरेश सत्यवान भोईर ( वेहेळे बांधकाम उपसमिती )  भिमराव नथु चौधरी (मु. सरवली , उपवाजार आवार उपसमिती  )  प्रशांत गोकुळदास म्हात्रे ( मु.खारंबाव सेवक उपसमिती ) अशा पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्ती प्रमाणपत्राचे वाटप देखील करण्यात आले. 


           या प्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गणेश चौधरी, सरवलीचे सरपंच नितेश चौधरी , बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे आदी उपस्थित होते. त्यांनी स्विकृत केलेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भिवंडी बाजार समितीचा १ वर्षाचा कालावधी शिल्लक असून एक वर्षानंतर निवडणूक होणार आहे. तो पर्यंत सदर उपसमित्या कार्यरत राहणार असून उपसमित्यांवर निवड झालेल्या सदस्यांनी यापुढे आपण बाजार समितीची प्रगति होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाच उपसमित्यांवर स्विकृत सदस्यांची निवड भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाच उपसमित्यांवर स्विकृत सदस्यांची निवड Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads