Header AD

मोहने येथील कोविड सेंटर सुरु करण्याची राष्ट्रवादीची मागणी




कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसोबतच मोहने येथील कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत असून या वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोहने येथे उभारलेले कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील आणि माजी नगरसेवक जे. सी. कटारिया यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पाटील यांनी पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना दिले आहे.


             मोहने येथील एन.आर.सी. स्कूल येथे महापालिकेच्या वतीने कोरोना पेशंटसाठी सर्व सुविधांसह ३१८ बेडचे सेंटर सुमारे ९५ लाख रुपये खर्च करून उभारले होते. परंतु हे सेंटर रुग्ण संख्या कमी झाल्याने सुरु केले नव्हते. आता सद्धस्थितीत मोहने, मांडा टिटवाळा परिसरात कोरोना पेशंटची संख्या दररोज वाढत आहे. या स्थितीत या पेशंटला बाहेर पाठविले जात आहे. असे असतांना हे कोविड सेंटर बंद असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोहने येथील हे कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील यांनी केली आहे.

मोहने येथील कोविड सेंटर सुरु करण्याची राष्ट्रवादीची मागणी मोहने येथील कोविड सेंटर सुरु करण्याची राष्ट्रवादीची मागणी Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads