Header AD

ठाण्यातील कार्यकर्त्यांनी सुरू केली करोना हेल्प - लाईनठाणे , प्रतिनिधी  ;  गंभीर होत जाणार्‍या परिस्थिती मध्ये आता ठाणेकरांना कोणी वाली राहिलेला नाही, प्रशासनाची मदत मिळत नाही आणि केवळ नशिबावर भरवसा ठेवण्याची गंभीर वेळ आली आहे. रुग्णांना धावपळ करून तातडीने मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देणे, रूग्णांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांना मानसिक आधार देणे यासाठी ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


         ठाण्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (से.), धर्मराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, स्वराज इंडिया, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी या परिवर्तनवादी पक्षांच्या तसेच लोकराज संघटन व मतदाता जागरण अभियान या नागरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नागरिक विकास आघाडीच्या वतीने ठाणे शहरातील करोना बाधित रुग्ण व त्यांच्या  नातेवाईकांसाठी एक हेल्प-लाइन आजपासून सुरू केली आहे..


              रुग्णांना बेड आणि इस्पितळतील रुग्णांना इंजेक्शन मिळवून देण्यासाठी गरीब व सर्वसामान्य जनतेला या हेल्प-लाइनच्या माध्यमातून ठाणे नागरिक विकास आघाडीचे कार्यकर्ते चोवीस तास धावपळ करून मदतीचा हातभार लावणार आहेत. या हेल्प-लाइनच्या माध्यमातून आरोग्य-यंत्रणेवर लक्ष ठेवण्याचा व इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याचा देखील प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे ठाणे विकास आघाडीचे निमंत्रक डॉ चेतना दिक्षित, एड किशोर दिवेकर. अनिल म्हात्रे आणि सचिव धनाजी सुरोसे यांनी म्हटले आहे.           


अनिल म्हात्रे, 9833054856 / डॉ चेतना दिक्षित, 9867100199  / Adv किशोर दिवेकर 9220580345 /धनाजी सुरोसे 8424849616

ठाण्यातील कार्यकर्त्यांनी सुरू केली करोना हेल्प - लाईन ठाण्यातील कार्यकर्त्यांनी सुरू केली करोना हेल्प - लाईन Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads