नियमांचे उल्लंघन करणारे दुकाने सील करण्याची कारवाई सुरूच
कल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोना नियमांचे उल्लंघन करणारया दुकानांवर सील करण्याची कारवाई पालिकेने विविध प्रभागक्षेत्रात सुरूच ठेवली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केल्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे काल दिवसभरात महापालिकेच्या प्रभागक्षेत्रात काही दुकाने व मॅरेज लॉन्स सील करण्यात आले होते. आजही या आदेशाच्या अनुषंगाने अ प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी टिटवाळा येथील बाजारपेठेत नियमबाहय सुरु असलेली ३ दुकाने सील केली. क प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांनी कल्याण प. येथील कल्याण स्पोर्ट क्लबचे बॅडमिंटन कोर्ट आज सील केले.
ड प्रभागातही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी १ बियर शॉप सील केले. आय प्रभागातही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी व्दारली गावात १ सलुनचे चालू दुकान, पिसवली गावात सुरु असलेली ३ दुकाने, १ ऑटो गॅरेज तसेच टाटा पॉवर रोडवरील रेडिमेड गारमेंटचे दुकान सील करण्याची धडक कारवाई आज केली.

Post a Comment