Header AD

भारतातील अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स
■वाहन उद्योगातील कंपन्या सध्या ज्या आघाड्यांवर सर्वाधिक गुंतवणूक करत आहेत, त्यापैकी एक म्हणजे वाहन सुरक्षा. मागील काही वर्षांत, वाहन कंपन्यांनी रस्त्यावरील अपघात टाळण्यास मदत करणारे अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. चालकाला सुरक्षित आणि उत्तम ड्रायव्हिंगकरिता सहाय्य करणारे हे तंत्रज्ञान स्वयंचलित, सुविधायुक्त असून वाहनाची प्रणालीही सुधारते. या तंत्रज्ञानालाच अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स (एडीएस) असे म्हटले जाते. ट्रिटॉन मार्केटिंग रिसर्चने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, जगातील अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स (एडीएस)चे मार्केट २०२७ पर्यंत १९.४६ % सीएजीआर देत ८०.९७ अब्ज डॉलर एवढे मूल्य धारण करेल. सध्या एमजी मोटर, वोल्वो, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज हे प्रमुख कार उत्पादक अडाप्टिव्ह कंट्रोल, लेन किपिंग असिस्टन्स आणि ऑटोमॅटिक ब्रेक यासारख्या रिअल अॅडव्हान्स्ड असिस्टन्स सिस्टिम पुरवतात.


          सध्या भारताचे एडीएस मार्केट हे सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अगदी काही टक्के वाहनांमध्येच ही सुविधा आहे. ड्रायव्हिंगचत्या स्वयंचलित वर्गीकरणात ही सुविधा खालील पातळीवर (१-२)वर येते. सुरक्षित ड्रायव्हिंग उपाययोजनांची गरज वाढत असताना एडीएस ची बाजारपेठ भारतात वाढल्याचे वाहननिर्मात्यांना जाणवत आहे. पुढे काही महत्त्वाच्या एडीएस तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे:अडॉप्टीव्ह क्रूझ कंट्रोल: अडॉप्टीव्ह क्रूझ कंट्रोल (एसीसी)ही इंटेलिजंट सिस्टिम असून, याद्वारे चालकाला दोन वाहनांदरम्यानचे योग्य अंतर राखण्यास मदत केली जाते. तसेच दुसऱ्या वाहनाच्या दिशेने जाताना आपोआप वेग कमी-जास्त केला जातो. एसीसी लेझर सेन्सरनुसार काम करते, एखादे वाहन असल्याचे कळाल्यास, ते वाहनाला वेग कमी करण्याची सूचना देते. अडॉप्टिव्ह कंट्रोल सिस्टिममध्ये रडार हेडवे सेन्सर, डिजिटल सिग्नल प्रोसेसर आणि लाँगीट्यूड कंट्रोलरचा समावेश आहे. सिस्टिमला वाहनाच्या मार्गात एखादे दुसरे वाहन आढळल्यास, ती इंजिन आणि ब्रेकशी जोडलेली आहे. तती आपोआप वाहनाचा वेग कमी करते आणि मार्ग मोकळा झाल्यावर वाहनाला पुन्हा वेग धारण्याची मुभा देते. भारतातील एसीसी प्रणालीसह अद्ययावत कार मॉडेल्स- एमजी ग्लोस्टर, बीएमडब्ल्यू ३ सीरीज आणि वोल्वो एस६० हे आहेत.लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिम: लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिमद्वाररे चालकाला वाहन लेनमध्ये ठेवण्यास मदत करते. यामुळे रस्त्यावरील अपघात कमी होऊ शकतात. वाहन आपल्या लेनमधून बाहेर जात असल्यास या सिस्टिमद्वारे ऑडिओ-व्हिज्युअल अलर्ट मिळतात. लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टिमअंतर्गत रिअर-व्ह्यू मिररजवळ एक छोटा कॅमेरा लावलेला असतो. याद्वारे रस्त्यावरील लेनच्या खुणा ओळखल्या जातात. योग्य ब्लिंकरशिवाय वाहन लेनच्या बाहेर जाऊ लागते, तेव्हा या सिस्टिममधून अलार्म वाजतो, त्यावर आपल्याला लगेच प्रतिक्रिया द्यावी लागते. भारतात फक्त एमजीच्या ग्लोस्टरमध्ये ही सुविधा आहे.फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग सिस्टिम: फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग सिस्टिम ही वाहनातील इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे, जी समोरील बाजूने वाहनाच्या मार्गात आलेल्या अडथळा किंवा वाहनांची सूचना देते. आधुनिक कोलायजन वॉर्निंग सिस्टिम रडार, लेझर आणि कॅमेरा सिस्टिमवर चालते. ती अपघाताची शक्यता असल्यास ऑडिओ, व्हिज्युअल व धोरणत्मक अलर्ट देते. ही सिस्टीम दोन वाहनांमधील अंतर, कोनीय दिशा आणि सापेक्ष गमी मोजते. अनेक फॉरवर्ड वॉर्निंग सिस्टिम्स या अडॉप्टीव्ह कंट्रोल सिस्टिमशी जोडलेल्या असतात. जेणेकरून, समोरील मार्गात एखादे वाहन आढळल्यास वाहनाच्या वेगावर नियंत्रण करते.टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टिम्स (टीएमपीएस):रस्त्यावरील वाहनाचे सस्पेंशन आणि सुरक्षिततेची हमी देण्याकरिता टायर प्रेशर एक प्रमुख निकष असू शकतो. असमान टायर प्रेशरमुळे मायलेजची समस्या, अधिक उत्सर्जन, टायर लवकर खराब होणे, टायर फुटणे आदी समस्या उद्भवू शकतात. यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टिम ही प्रमुख एडीएस सिस्टिम आहे, कारण एखाद्या टायरमध्ये कमी हवा असल्यास ते चालक शक्तीला सूचना देते. टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टिम दोन प्रकारच्या असततात. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सिस्टिम्स. इनडायरेक्ट टीपीएमएस सिस्टिम टायर्सचे आरपीएम (प्रति मिनिटातील चक्र) मोजते. काही चुकीचे आरपीएम मोजले गेल्यास, सिस्टिमद्वारे चालकाला याची सूचना दिली जाते. तर दुसरीकडे डायरेक्ट टीएमपीएस सिस्टिममध्ये प्रत्येक टायरला प्रेशर सेंसर्स जोडलेले असतात. त्यामुळे टायरमधील आतील दाबाचे अचूक रीडींग घेतले जाते.


पार्किंग असिस्टन्स सिस्टिम्स: पार्किंग असिस्टन्स सिस्टिम ही सर्वाधिक वापरली जाणारी एडीएस सिस्टिम आहे. एमजी ग्लोस्टर आणि सिट्रॉन सी५ ला पार्किंग असिस्टन्स सिस्टिम असून यात अल्ट्रासोनिक सेंसरचा वापर केला जातो. पार्किंग करताना वाहनाच्या मार्गातील अडथळ्याचा संकेत देण्याकरिता ही प्रणाली वाहनाच्या पुढील व मागील बंपरला लावलेली असते. यासह, मागील कॅमेरा या सिस्टिममध्ये जोडलेला असून, याद्वारे पार्किंग करताना व्हिज्युअल असिस्टन्स मिळते. वाहन आणि मार्गातील अडथळ्यादरम्यानचे अंतरही या सिस्टिमद्वारे ओळखले जाते.

भारतातील अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स भारतातील अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads