Header AD

संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह ब्रह्मलीन


कल्याण , कुणाल म्हात्रे ; संत निरंकारी मंडळाचे प्रधान तसेच मिशनचे समर्पित संत पूज्य गोबिन्दसिंहजी यांनी आज पहाटे ३.२० वाजता जालंदर (पंजाब) येथे आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि ते निराकार ईश्वरामध्ये विलीन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे इतके होते.

     


       गोबिन्दसिंहजीज्यांना मोठ्या आदराने भाईया जीम्हणत असत त्यांचा जन्म २० जुलै, १९३५ रोजी अविभाज्य हिन्दुस्थानातील झेलम जिल्ह्यामध्ये (आता पाकिस्तानात) झाला. त्यांच्या  तप-त्यागाने ओतप्रोत जीवन आणि असाधारण योगदान यांचे मिशनच्या इतिहासात सदैव स्मरण कले जाईल.           बाबा गुरबचनसिंहजी यांनी तयार केलेल्या मंडळाच्या ५१ सदस्यीय वर्किंग कमेटीचे ते  संस्थापक चेअरमन होते. पुढे १९८७ साली बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी त्यांना संत निरंकारी मंडळाचे जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले. मिशनच्य वार्षिक संत समागमांचे चेअरमन म्हणून त्यांनी सदोदित आपल्या सेवा अर्पण केल्या. 

     

         

          गोबिन्दसिंह यांनी संत निरंकारी मंडळाचे विविध विभागजसे -  जमीन खरेदी व भवन निर्माणसामान्य प्रशासन व ब्रँच प्रशासन या सेवा गुरुमतानुसार मोठया सचोटीने पार पाडल्या.  त्यांनी आपल्या सर्व सेवा समर्पित भावनेने आणि भक्तिभावाने युक्त होऊन निभावल्या. संत निरंकारी मंडळाचे प्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते मिशनच्या केंद्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे प्रथम चेअरमन म्हणून कार्यरत होते. 


        

         त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.  त्यांच्या पत्नी चरणजीत कौर जीया बाबा अवतारसिंहजी यांच्या कन्या होत्या ज्यांनी २२ जानेवारी,२००९ रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.

             

             गोबिन्द सिंह यांनी आपल्या महान आध्या त्मिक जीवनाद्वारे मानवतेच्या सेवेमध्ये आपली एक अमिट छाप उमटवली असून येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी त्यांचे जीवन मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत्र बनून राहिली. त्यांच्या सेवांचे मिशनकडून सदैव स्मरण केले जाईल.

संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह ब्रह्मलीन संत निरंकारी मंडळाचे प्रधान गोबिन्दसिंह ब्रह्मलीन Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads