Header AD

भिवंडी महानगर पालिका स्थायी समिती सभापती संजय लक्ष्मण म्हात्रे यांची बिन विरोध निवड



भिवंडी , प्रतिनिधी  ;  भिवंडी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाकरता आज झालेल्या निवड निवडणूक कार्यक्रमात स्थायी  समिती सदस्य संजय लक्ष्‍मण म्हात्रे यांची स्थायी समिती सभापती  म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. पालिकेच्या स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात स्थायी समिती सभापती निवडकरिता  विशेष सभेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून संजय लक्ष्मण म्हात्रे यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश नार्वेकर यांनी काम पाहिले. 



या वेळेला महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया,अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड, सर्व स्थायी समिती सदस्य यांच्यासह प्रभारी नगरसचिव नितीन पाटील जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते. सभापती निवड झाल्यावर  पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित सर्व स्थायी समिती सदस्य यांनी देखील संजय म्हात्रे यांचे अभिनंदन केले.



 या नंतर लगेचच नवनिर्वाचित सभापती संजय म्हात्रे यांनी मावळते सभापती हलीम अन्सारी यांचेकडून स्थायी समिती पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी उपस्थित सर्व  नगरसेवक यांनी नवनिर्वाचित सभापती यांचे अभिनंदन केले.
भिवंडी महानगर पालिका स्थायी समिती सभापती संजय लक्ष्मण म्हात्रे यांची बिन विरोध निवड भिवंडी महानगर पालिका स्थायी समिती सभापती संजय लक्ष्मण म्हात्रे यांची बिन विरोध निवड Reviewed by News1 Marathi on April 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads