Header AD

ठाणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ऐतिहासिक रूप घ्या खासदार राजन विचारे...
ठाणे , प्रतिनिधी   ;  ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाला दि.16 एप्रिल2021 रोजी 168 वर्षे पूर्ण होत असताना ठाणे रेल्वे स्थानकात नव्याने होणाऱ्या इमारतीची पाहणी दि. १२ एप्रिल २०२१ रोजी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समवेत केली.त्यावेळी सुप्रसिद्ध वास्तुविशारद हितेन सेठी, असोसिएट चे सुनील भालेराव तसेच मध्य रेल्वेचे ए.डी. आर. एम. इन्फ्रा आशुतोष गुप्ता, सीनियर डी. ई. एन. गर्ग,इलेक्ट्रिक विभागाचे डी. इ. इ.सुद, सीनियर डी. सी. एम. एम एल मीना, ठाणे सी सी आय संदीप तिवारी, आर पी एफ पी व्ही सिंग, स्टेशन मास्तर आर के मीना, ठाणे महानगरपालिकेचे उपकार्यकारी अभियंता निलेश पाटणकर तसेच माजी नगरसेवक गिरीश राजे, रमाकांत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.


                खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकातील धोकादायक झालेल्या इमारत कधी पाडणार तसेच या ठिकाणी असलेले 5कार्यालय व वेटिंग रूम पार्किंग प्लाझाच्या इमारतीत शिफ्टिंग करणार आहेत तेथे काम पूर्ण झाले आहे का ?  याची विचारणा केली असता हे काम या महिन्याच्या 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करून इमारत पाडण्यात येणार आहे. तसेच या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात नव्याने होणाऱ्या इमारतीचा आराखडा सुप्रसिद्ध वास्तुविशारद हितेन शेट्टी असोशियट यांच्याकडून बनवून घेण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 


              या इमारतीचे रूप ऐतिहासिक असे वाटले पाहिजे तसेच रेल्वे स्थानकात ट्रेन आली असता त्यामधील प्रवासी तात्काळ स्थानकाच्या बाहेर पडले पाहिजे यासाठी या इमारतीची रचना अशी करा की कार्यालय पहिल्या मजल्यावर करावी. तळमजला मोकळा ओपन ठेवावा. अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कार्यालय किंवा दुकान ठेवू नका अशा सूचना त्यावेळी खासदार विचारे यांनी रेल्वे व वास्तुविशारद यांना केल्या.


                  तसेच नुकताच ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकात ब्रिटिश कालीन रेल्वे इंजिन बसविण्यात आले होते. त्या परिसरात म्युझियमसाठी मुंबईमध्ये बनविण्यात आलेल्या धरतीवर गॅलरी बनविण्यात यावी याचा नियोजित आराखडा तयार करावा व या कामासाठी निधी कमी पडल्यास खासदार निधी वापरावा अशा सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


             तसेच कोपरी दिशेला बंद पडलेल्या सरकत्या जिन्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने रेल्वेला पत्राद्वारे कळवावे. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील बंद पडलेले पाण्याचे आर ओ दुसरा ठेकेदार नेमून लवकरात लवकर चालु करण्यासाठी सूचना केल्या त्यानंतर पश्चिमेकडे बनविण्यात आलेले वातानुकूलित शौचालयाची झालेली दुरावस्था पाहून त्याची तात्काळ दुरुस्ती करून पर्यायी शौचालय प्रवाशांसाठी सुरू करावे अशा सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या


ठाणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ऐतिहासिक रूप घ्या खासदार राजन विचारे... ठाणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ऐतिहासिक रूप  घ्या खासदार राजन विचारे... Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads